मुंबई-पुणे महामार्ग अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर होणार शासकीय खर्चाने उपचार

105

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! हार्बर रेल्वेवरचा मेगाब्लॉक रद्द)

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करून आभार मानले आहेत.

दरम्यान, यासंदर्भातील माहितीनुसार मुंबईच्या गोरेगाव येथील बाजीप्रभू गट (झांज पथक) पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेने परतत होते. या बसमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी होते. ही बस बोरघाटातून जात असताना चालकाचा ताबा सुटून ही बस दरीत कोसळली. या घटनेत सुमारे ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आतापर्यंत २५ जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.