मागील दोन ते तीन वर्षांपासून संपूर्ण जग वेगवेगळ्या व्हायरसच्या आजारांना तोंड देत आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या विषाणूंनी डोकं वर काढलं आहे. पुन्हा रुग्णालयांमध्ये मास्क सक्ती झाली आहे. अशातच सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच रुग्णालयांसोबतच देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्य सरकारसोबत बैठक आयोजित केली होती.
राज्यात १३ ते १५ एप्रिल या सलग तीन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांनी एक हजारांचा टप्पा गाठला आहे. तर दुसरीकडे रुग्ण संख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढतांना दिसत आहे. गेल्या ११ दिवसांची आकडेवारी पाहता राज्यात कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. निधन झालेल्या बहुतांश रुग्णांना कोरोना सोबतच अजून एखाद्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे आधीपासून एखाद्या आजराने ग्रासलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
(हेही वाचा –कोरोना रुग्णसंख्येत वाढ! महाराष्ट्रात तब्बल १११५ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार ९ एप्रिल २०२३ रोजी सर्वाधिक म्हणजेच एका दिवसात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थिती लक्षात घेता ६० वर्षांवरील अधिक नागरिकांनी, सुरुवातीपासून एखादा आजार असणाऱ्या माणसांनी, तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेतल्यास कोरोना विषाणूला रोखता येणे सहज शक्य आहे. गर्दीच्या ठिकाणे मास्क लावावा.
Join Our WhatsApp Community