केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परीक्षा आता केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत होणार नाहीत, तर या व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्येही या परीक्षा होणार आहेत. तशी मान्यता केंद्र सरकारने दिली आहे. CRPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे या भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत दिल्या जाणार आहेत. गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापर आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. विशेष म्हणजे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून CRPF भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते.
(हेही वाचा पुलवामा हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप!)
Join Our WhatsApp Community