‘म्हाडा’कडून विजेत्यांना देय कराराचे वितरण नाही

93

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (म्हाडा) पुणे मंडळातर्फे जानेवारी महिन्यात सहा हजारांहून अधिक सदनिकांसाठी नूतन ऑनलाइन प्रणालीद्वारे (सॉफ्टवेअर) सोडत काढण्यात आली. या सोडतीचा निकाल जाहीर करून एक महिन्याचा कालावधी होत आला, मात्र तरीही विजेत्यांना देयकरार पत्र वितरित करण्यात आलेले नाही.

(हेही वाचा –#exclusive : मराठी चित्रपटांची गळचेपी; २०० हून अधिक सिनेमे सेन्सॉर प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत

म्हाडाच्या पुणे महामंडळातर्फे जानेवारी महिन्यात काढण्यात आलेल्या सोडतीसाठी इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएलएमएस) २.० हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले. मानवी हस्तक्षेपाशिवाय, कमी वेळेत आणि पारदर्शक निकाल लावण्यासाठी म्हाडाकडून या सॉफ्टवेअरचे काम एका खासगी कंपनीची निविदा मान्य करून काम त्यांना देण्यात आले. परंतु, सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्याने कागदपत्रांची पूर्तता, प्रमाणीकरण, पुन्हा बदल, मुदतवाढ, दिरंगाई अशा अनेक कारणांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. त्याचे परिणाम निकालानंतर ही दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.