रूग्णांचा त्रास दूर करणारे डॉक्टर्स आता सैनिकांचे मनोरंजन करायला थेट आसामला जाणार आहेत. महाराष्ट्राच्या पुण्यातील डॉक्टर्स बॅंड सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.
( हेही वाचा : दादरमध्ये जमालची कमाल, फेरीवाले जोमात : भाजप कोमात!)
गेल्या काही वर्षांत १५० हून अधिक शोज केलेल्या या बॅंडमध्ये सर्व प्रकारच्या डॉक्टरांचा समावेश आहे ..
- पीडियाट्रिशिन
- ऑन्कोलॉजिस्ट
- रेडियोलॉजिस्ट
- डेंटिस्ट
त्यांनी समोरूनच विचारलं …
डॉक्टरांचा हा बॅंड डॉक्टर्स ऑर्केस्ट्रा फॉर चैरिटी एंड सोशल सर्विस (DOCS) या नावाने ओळखला जातो. नोव्हेंबर २०२२ मध्ये या बॅंडने पुण्यातल्या एका शाळेत शो केला होता. तेव्हा ऑडियन्समध्ये रिटायर्ड सैन्य अधिकारी बसले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी बॅंडला विचारलं, की ते सैनिकांसाठी शो करतील का? त्यांनी लगेच एकमताने होकार दिला. त्यामुळे पुण्यातल्या डॉक्टरांचा हा बॅंड आता आसामसह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहे.
ही आहे शोची थीम ..
- आसामच्या मिसामरी आणि अरुणाचल प्रदेशच्या टेंगा, तवांगच्या जवानांसाठी हा डॉक्टरांचा बॅंड परफॉर्मन्स सादर करणार आहे. या शोची थीम आहे – ‘रोमांस के रंग, डॉक्स के संग’. म्हणून या संपूर्ण शोमध्ये एकूण २२ रोमॅंटीक गाण्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
- या बॅंडच्या डॉक्टर संस्थापकांनी या विषयी अधिक माहिती दिली. त्यांना या गोष्टीचा गर्व आहे की, ते त्या सैनिकांसाठी परफॉर्म करणार आहेत जे वर्षातला अधिकतर वेळ त्यांच्या कुटूंबापासून दूर असतात.
शोच्या तारखा ..
- एप्रिलच्या १५, १६, १७ तारखेला शोज होणार आहेत.
- डॉक्टर्स ऑर्केस्ट्रा फॉर चैरिटी एंड सोशल सर्विस (DOCS) या बॅंडने शोजच्या माध्यमातून मिळणारे पैसे समाजासाठी खर्च केले आहेत. आतापर्यंत अनेक कोटी रूपये त्यांनी सामाजिक संस्थांना दान दिले आहेत. या संस्था दिव्यांग, मानसिक स्वास्थ्याशी संबंधित रोगी तसेच कॅन्सरच्या रूग्णांसाठी काम करतात.