मेट्रो कारशेडवरून आदित्य ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल, म्हणाले… 

87

शिंदे – फडणवीस सरकार आल्यावर मेट्रो कारशेडची कांजूरमार्ग येथील जागा बदलून ती आरे येथे करण्यात आली. तेव्हापासून ठाकरे गटाने या सरकारच्या विरोधात आगपाखड करायला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी या विषयावर पुन्हा राज्य सरकारला लक्ष्य केले. कांजूरमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो-६ कारशेडसाठी दिली जाणार आहे. मग, उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

महसूल खात्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना मेट्रो-६ साठी कांजूरमार्गची १५ हेक्टर जागा ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही अडीच वर्षे बोलत आलो आहोत, मेट्रो-६ साठी कारशेड गरजेचे आहे. कारशेडविना २०१८ साली कंत्राट काढण्यात आले होते. नंतर कारशेड बनवणार कुठे हा प्रश्न होता. २०२१ साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील कारशेड कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरमध्ये हलवले. ४४ हेक्टरमध्ये मेट्रो ३,६,४,१४ या चार लाइन्सचे कारशेड एकत्र करणार होतो. यामागे जनतेचे आणि महाराष्ट्राचे पैसे वाचावेत हा एकच हेतू होता. चार कारशेड एकत्र केल्याने महाराष्ट्राचे १० हजार कोटी रुपये आणि वेळ वाचला असता. मेट्रो-३ आणि ६ ही लाइन मुंबई तर ४ आणि १४ ही लाइन ‘एमएमआरडीए’ परिसरातील होती. या चारही लाइन कांजूरमार्गमध्ये आल्याने ते केंद्र बनले असते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आरेतील आदिवासी बांधवांचे हक्क तसेच ठेऊन ८०० एकर जंगल आमच्या सरकारने घोषित केले, पण, मुंबईवर राग ठेऊन महाराष्ट्र भाजपाने केंद्र सरकारला हाक मारली. केंद्र सरकारचे मीठ आयुक्त, बिल्डरांनी आमचे सरकार पडेपर्यंत मेट्रोचे काम बंद ठेवले. मुंबईकरांना या कारशेडपासून वंचित ठेवण्यात आले. घटनाबाह्य सरकार आल्यानंतर मुंबईवर पहिला वार करत आरेत कारशेड नेण्यात ते यशस्वी झाले. आरेत अद्यापही झाडे कापण्यात येत आहेत. घटनाबाह्य सरकारचा एवढा राग मुंबईवर का आहे?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचा अमेरिकेसाठी धोक्याची घंटा; तुर्कस्तानसारखी होऊ शकते परिस्थिती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.