कुख्यात गुंड अतिक अहमदची गोळ्या घालून हत्या

110

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यापूर्वी अतिक अहमद यांचा मुलगा असद अहमद याचा झाशी एन्काऊंटर झाला होता. प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांना 10 हून अधिक गोळ्या लागल्या आहेत. पोलिस अतीक ला घेवून जात असतानाच त्याला अज्ञान लोकांनी गोळ्या घालून ठार केले. या घटनेचे सी सी टी व्ही फुटेजदेखील समोर आले आहे. ज्यावेळी अतिक वर गोळ्या घालण्यात येत होत्या तेव्हा पोलीसही दूर पळाले. हल्लेखोराने अतिक च्या डोक्याला पिस्तूल लावून गोळ्या झाडल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. यात अतिक जागेवरच ठार झाला. पोलिसांनी हल्लेखोराला पकडल्याचे वृत्त आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.