कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यापूर्वी प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडमधील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराचा उत्तर प्रदेश पोलिसांकडून १३ एप्रिल २०२३ रोजी एन्काऊंटर करण्यात आला. मुख्य आरोपी हा उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद होता. मुलानंतर आता वडील अतिक अहमद याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
या सर्व प्रकारामुळे उत्तर प्रदेश येथील वातावरण बिघडलं आहे. लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. एकूणच सर्वत्र तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच प्रयागराजमधील शांतता आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच कलम १४४ देखील लागू करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची सुट्टीदेखील रद्द करण्यात आली आहे. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(हेही वाचा –उमेश पाल हत्याकांड : जाणून घ्या आतापर्यंत किती एन्काऊंटर झाले?)
मिळालेल्या माहितीनुसार अतिक अहमद याच्यावर शनिवार १५ एप्रिल रोजी रात्री एका अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. अतिक अहमद याच्यावर गोळ्या झाडून त्या अज्ञात व्यक्तीने आत्मसमर्पण केलं आहे. त्याचसोबत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ अहमद हे दोघेही वैद्यकीय चाचणीसाठी जात असतांना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या सुरक्षतेसाठी असणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण १७ पोलिसांचे निलंबन झाले आहे.
Join Our WhatsApp Community