महाराष्ट्र भूषण सोहळा २०२२ : आप्पासाहेब मन स्वच्छ करतात – सुधीर मुनगंटीवार

99

महाराष्ट्र भूषण हा राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण २०२२ ने सन्मानित करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित आहेत. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी भाषण करत आपली भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी आप्पासाहेब यांच्या कार्याला वंदन केले. तसेच लवकरच महाराष्ट्रात महाराजांची तलवार आणि वाघनखे आणली जातील अशी घोषणा केली.

(हेही वाचा –महाराष्ट्र भूषण सोहळा २०२२ : सोहळ्याची जय्यत तयारी सुरु; लाखोंच्या संख्येने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी उपस्थित

नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे जसे मन स्वच्छ करतात तसे ते परिसरही स्वच्छ करतात. हाताला काम देऊन भविष्य घडविणाऱ्यांपैकी आप्पासाहेब एक आहेत. त्यांचा आज सन्मान होत आहे, हे पाहून आम्हाला अतिशय आनंद होत असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लवकरच म्हणजेच मे २०२३ पर्यंत शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरलेली वाघनखे आणि जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणली जाणार आहे. ही महाराष्ट्रासाठी फार मोठी आणि अभिमानाची बाब आहे. या सरकारचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.