बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे काही प्रश्न आहेत. तसेच काही शंकाचे निरसन होणे गरजेचे आहे अशी भूमिका वरळी बीडीडी चाळवासियांची आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार, १६ एप्रिलला बीडीडीवासीयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात असंतोष वाढत आहे. नीट माहिती दिली जात नाही. पार्किंग फक्त एकच देण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांना पार्किंग सुविधा कशी मिळणार याबद्दल अनिश्चचिता आहे, असे सर्व मुद्दे राज ठाकरेंच्या भेटीदरम्यान बीडीडीवासीयांनी मांडेल.
संदीप देशपांडेनी केली आदित्य ठाकरेंवर केली टिका
मनसे नेते संदीप देशपांडेनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना म्हटले की, यांना वरळी म्हणजे केवळ सी फेस आणि मोठमोठ्या बिल्डिंग इथपर्यंतच संबंध येतो.
दरम्यान बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे अधिकृत कंत्राटदार म्हणून टाटा कंपनीची निवड झाली. ११ हजार कोटी रुपयांच्या पुनर्विकासाचे कंत्राट टाटा कंपनीच्या झोळीत पडले. ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि शिवडी या तीन ठिकाणच्या चाळी सुमारे ८७ एकर भूखंडावर पसरल्या आहेत.
(हेही वाचा – महाविकास आघाडीची सभा ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वार्थीसाठी – सुधीर मुनगंटीवार)
Join Our WhatsApp Community