Police : कांदिवलीतील हत्या प्रेमप्रकरणातून; एकाला प्रयागराज येथून अटक

सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या मदतीने कांदिवली पोलिसांच्या तपास पथकाने मारेकऱ्याची ओळख पटवून त्याला उत्तर प्रदेश मधील प्रयोगराज येथून अटक करण्यात आली.

146

दोन दिवसापूर्वी कांदिवली येथे ३२ वर्षीय इसमाची गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येचा उलगडा झाला आहे, या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून एकाला अटक केली आहे. हि हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले असून अटक करण्यात आलेला मारेकरी हा गोळीबारात ठार झालेल्या इसमाच्या पत्नीचा प्रियकर असल्याचा माहिती पोलिसांनी दिली आहे. रोहित चंद्रशेखर पाल (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तो उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे राहणारा आहे.

कांदिवली पश्चिम एकता नगर येथे राहणारा मनोज चौहान (३२) याची रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या गोळीबाराची घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या मदतीने कांदिवली पोलिसांच्या तपास पथकाने मारेकऱ्याची ओळख पटवून त्याला उत्तर प्रदेश मधील प्रयोगराज येथून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या रोहित पाल याने पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहिती अशी कि, मृत मनोज चौहान हा आरोपीच्या गावातील असून मनोज हा कामासाठी मुंबईत राहत होता, त्याची पत्नी हि गावी प्रयागराज सासू सासऱ्यासोबत राहत होती. मागील चार वर्षांपासून आरोपीचे आणि मृत मनोज याच्या पत्नीचे प्रेमप्रकरण सुरु होते, वर्षभरापूर्वी या दोघांना मनोजच्या कुटुंबीयांनी एकत्र पकडले होते व आरोपी रोहित याला मारहाण करून हे प्रेमप्रकरण थांबविण्यासाठी सांगितले होते. परंतु त्यानंतर देखील या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. प्रेमाच्या आड येणाऱ्या मनोज याला ठार करण्याची योजना आखून रोहित पाल याने गावातून एक देशी कट्टा विकत घेऊन १५ दिवस गोळीबाराचा सर्व करून मुंबईत आला होता, व मनोज याला ठार करण्याची संधी शोधात असताना रविवारी सकाळी मनोज दाढी करण्यासाठी घराबाहेर पडला असता दबा धरून बसलेल्या रोहित याने मनोजच्या दिशेने देशी कट्टयातून दोन गोळ्या झाडल्या, या गोळीबारात मनोज हा गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी रोहित पाल याला हत्येप्रकरणी अटक केली असून या हत्येत मनोज याच्या पत्नीचा सहभाग आहे का हे तपासण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर ‘वॉच’; दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.