राज्य शासनाच्या अखत्यारीतील शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील अशा ४७ हेक्टर जागेवर आता विविध प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी हस्तांतरीत करून त्याठिकाणी भविष्यात जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या जागा हस्तांतरण करण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
(हेही वाचा – सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे ४७ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनी शिर्डी, साकुरी, निमगाव, कोऱ्हाळे, शिरसगाव या गावात उपलब्ध असून, त्या विनावापर आहेत. या जागांचा जनहितार्थ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, भाविकांच्या सोयी सुविधांसह अम्युझमेंट पार्क/लेझर तथा फाऊंटन शो/गार्डनची उभारणी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वापर करणे, बाजर समिती, ग्रामपंचायत साकुरी, नगरपरिषद राहाता, ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे, ग्रामपंचायत बेलापूर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी, मध्यवर्ती प्रशासकीय संकुल तसेच विविध शासकीय कार्यालय, अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी या जागेचा वापर केला जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community