महाराष्ट्रातील राजकारणात येत्या काळात आणखीन भूकंप होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शिंदे गटाचे २२ आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विनायक राऊतांच्या या गौप्यस्फोटावर प्रहारचे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता एवढा मोठा स्फोट झाला, तरी ते थंड झाले नाही का?’, असा खोचक सवाल बच्चू कडूंनी विनायक राऊतांना केला आहे.
(हेही वाचा – शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांना ‘त्या’ प्रकरणातून मिळाली क्लिन चीट)
बच्चू कडू नेमके काय म्हणाले?
विनायक राऊतांच्या गौप्यस्फोटावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘आता एवढा मोठा स्फोट झाला, तरी ते थंड झाले नाही का? काही राहिलेच नाही. १५ आमदाराच आता ठाकरे गटाकडे राहिलेत. आणि सगळे ४० आमदार इकडे आले आहेत. आता कसा स्फोट होणार आहे, की उरलेले १५ इकडे येणार आहेत, ते येणाऱ्या काळात समजेल.’
तसेच बच्चू कडू पुढे म्हणाले की, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून मंत्री नाराज वगैरे काही नाही. एवढा निधी मुख्यमंत्री शिंदेंनी दिला आहे, जो मंत्री झाल्यावर भेटला नसता. त्याच्यामुळे लोकं काही नाराज नाहीयेत. मला असे वाटते, पदापेक्षा काम महत्त्वाचे आहे. आणि काम शिंदे सरकार देत आहे.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community