मुंबई महापालिकेच्या ‘या’ सहा उपप्रमुख अभियंत्यांना प्रमुख अभियंता पदी बढती; अजूनही पाच प्रमुख अभियंता प्रभारीच

303
मुंबई महापालिकेच्या 'या' सहा उपप्रमुख अभियंत्यांना प्रमुख अभियंता पदी बढती; अजूनही पाच प्रमुख अभियंता प्रभारीच
मुंबई महापालिकेच्या 'या' सहा उपप्रमुख अभियंत्यांना प्रमुख अभियंता पदी बढती; अजूनही पाच प्रमुख अभियंता प्रभारीच

सचिन धानजी, मुंबई

महापालिकेत तब्बल ११ खात्यांचे प्रमुख अभियंता पदांची पदे रिक्त असून या ११ पदांच्या प्रमुख अभियंता पदी सध्या प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून उपप्रमुख अभियंता पदावरील अधिकारी हे प्रमुख अभियंता पदाचा प्रभारी भार सांभाळत असले तरी यातील सहा उपप्रमुख अभियंता यांना प्रमुख अभियंता पदी बढती मिळाली आहे. या सहा अभियंत्यांपैकी रवींद्र सोनवणे यांचा निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी बढतीचे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे ०५ उपप्रमुख अभियंता हे प्रमुख अभियंता पदाच्या बढती पासून वंचित ठेवले असून या पदावर प्रशासनाने मर्जीतील आणि बढतीसाठी पात्र नसलेल्या उपप्रमुख अभियंत्यांवर प्रमुख अभियंता पदाचा प्रभारी भार सोपवून महत्वाच्या खात्यांचा कारभार चालू केला जात आहे.

(हेही वाचा – BMC : रस्ते बाधितांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अतिरिक्त एफएसआयचा लाभ घेणाऱ्या विकासकांची चौकशी?)

महापालिकेतील ११ प्रमुख अभियंता प्रभारी, महापालिका प्रशासकाच्या हाती, तरीही प्रमुख अभियंता पदे रिक्तच या आशयाचे वृत्त हिंदुस्थान पोस्ट १० मे २०२३ रोजी प्रकाशित करून या ११ खात्यांचा तसेच विभागाच्या प्रमुख अभियंता पदाचा भार उपप्रमुख अभियंता यांच्याकडे असल्याची बाब उघडकीस आणली. त्यामुळे प्रभारी प्रमुख अभियंता पदाचा तात्पुरता भार सोपवून यासाठी पात्र असलेल्या उपप्रमुख अभियंता यांना बढतीपासून वंचित ठेवले जाते तसेच पात्र नसलेल्या पण मर्जीतील उपप्रमुख अभियंता पदी प्रभारी प्रमुख अभियंता म्हणून वर्णी लावून पात्र उपप्रमुख अभियंता यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची बाब हिंदुस्थान पोस्टने निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी प्रमोशन कमिटीची बैठक ३० मे २०२३ रोजी निमंत्रित केली होती.

दरम्यान, २९ मे रोजी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष खासदार राहुल शेवाळे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत चहल यांनी प्रमोशन कमिटीत योग्य निर्णय घेऊन तात्काळ त्यांच्या बढतीचे प्रस्ताव सादर करत त्यांना कायम प्रमुख अभियंता पदाचा भार सोपवला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी ३० मे रोजी झालेल्या बैठकीत संजय कौंडण्यपुरे, रवींद्र सोनवणे, संदीप कांबळे, राजू जहागीरदार, चंद्रकांत मेतकर, वसंत गायकवाड या सहा उपप्रमुख अभियंता यांना प्रमुख अभियंता पदी बढती दिली असून याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकानी मंजुरी दिल्यानंतर त्यांचे कार्यालयीन आदेश काढण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.