Shiv Rajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज

150 एसटी, 350 आरोग्य कर्मचारी, दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

840
Shiv Rajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष आहे. राज्याभिषेक (Shiv Rajyabhishek Sohala 2023) सोहळ्याला यावर्षी म्हणजेच २ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ३५०वे वर्ष पूर्ण होत आहेत, याच पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरी होत आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यातून शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर जमले आहेत.

यंदा तिथीनुसार राज्यभिषेक (Shiv Rajyabhishek Sohala 2023) सोहळा साजरा होण्यापूर्वी रायगडावर आज म्हणजेच १ जून गुरुवार शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली शिवभक्तांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – chhatrapati shivaji maharaj : शिवराज्याभिषेक दिनासाठी सावरकर स्मारकातून पालखीचे रायगडाकडे प्रस्थान)

यानिमित्त रायगडावर (Shiv Rajyabhishek Sohala 2023) येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवारी (2 जून) रोजी सकाळी 8.30 वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

अशी असेल व्यवस्था

गडाच्या(Shiv Rajyabhishek Sohala 2023) पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करता येणार आहेत.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर 10 हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी 40 हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे.

शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 वैद्यकीय सेंटर्स तैनात केली जाणार आहेत. यात गडावर सहा, पायऱ्यांवर सहा तर पायथ्याशी सात आणि वाहनतळावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत.

गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे.

रायगड किल्ले (Shiv Rajyabhishek Sohala 2023) परिसरात जवळपास 2 हजार पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येतील

याशिवाय पायरी मार्गाने रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पायरीमार्गावर पुरेसे पथदिवे लावण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.