Deccan Queen @93 : दख्खनच्या राणीला ९३ वर्षे पूर्ण; गेल्या नऊ दशकांत असे बदलले रुपडे

चांगल्या सुविधा, आरामदायी दर्जा आणि उत्तम सेवेचा दर्जा यांसाठी प्रवासी जनतेच्या सतत वाढत चाललेल्या आकांक्षांसह, डेक्कन क्वीन (Deccan Queen @93) ट्रेन मध्ये संपूर्ण बदल करणे आवश्यक मानले गेले.

303
Deccan Queen @93 : दख्खनच्या राणीला ९३ वर्षे पूर्ण; गेल्या नऊ दशकांत असे बदलले रुपडे

मुंबई आणि पुणे दरम्यान सध्या अनेक रेल्वे धावतात. पण या दोन शहरांदरम्यान धावलेली सर्वात पहिली रेल्वे म्हणजे डेक्कन क्वीन. (Deccan Queen @93) १ जून २०२३ रोजी या रेल्वेला तब्बल ९३ वर्ष पूर्ण होत आहेत. ‘डेक्कन क्वीन’ ची सुरुवात ग्रेट इंडियन पेनिन्सुला या कंपनीने केली. रेल्वेच्या इतिहासातील हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वेवर दाखल करण्यात आलेली ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते, ज्याला ‘दख्खनची राणी’ (‘दख्खन की रानी’) असेही म्हटले जाते.

सुरुवातीला, ही ट्रेन प्रत्येकी 7 डब्यांच्या 2 रेकसह सादर करण्यात आली होती. डेक्कन क्वीनमध्ये (Deccan Queen @93) सुरुवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची सोय होती. 1 जानेवारी 1949 रोजी प्रथम श्रेणी रद्द करण्यात आली आणि द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना करण्यात आली, जी जून 1955 पर्यंत चालू राहिली.

(हेही वाचा – Electricity Demand : मुंबईत एका दिवसात ३९६८ मेगावॅट विजेच्या मागणीची नोंद)

चांगल्या सुविधा, आरामदायी दर्जा आणि उत्तम सेवेचा दर्जा यांसाठी प्रवासी जनतेच्या सतत वाढत चाललेल्या आकांक्षांसह, डेक्कन क्वीन (Deccan Queen @93) ट्रेन मध्ये संपूर्ण बदल करणे आवश्यक मानले गेले.

काळानुसार बदल आवश्यक

२०२३ मध्ये दख्खनच्या राणीने (Deccan Queen @93) ९३ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. अशातच गेल्या वर्षांत प्रवाशांच्या लाडक्या क्वीनने स्वत:मध्ये अनेक आवश्यक ते बदल केले आहेत.

– डेक्कन क्वीनमध्ये सुरुवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची सोय होती.
– १ जानेवारी १९४९ रोजी प्रथम श्रेणी रद्द करून द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुर्नरचना
– एप्रिल १९७४ पासून डेक्कन क्वीन ७ डब्यांवरून १२ डब्यांची करण्यात आली
– १९९५ मध्ये १२ डब्यांची डेक्कन क्वीन १७ डब्यांची करण्यात आली

LHB डबे:

रेल्वेने ट्रेन (Deccan Queen @93) क्रमांक 12123/12124 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे सर्व पारंपरिक डबे एलएचबी कोचने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. LHB कोचची सुधारित रचना असलेली ट्रेन आता दिनांक 22.06.2022 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आणि दिनांक 23.06.2022 पासून पुणे येथून धावेल.

सुधारित संरचना: चार एसी चेअर कार, 8 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक व्हिस्टा डोम कोच, एक एसी डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.