चुकीच्या नंबरवर मोबाईल रिचार्ज केला, तरीही घाबरू नका

281
चुकीच्या नंबरवर मोबाईल रिचार्ज केला, तरीही घाबरू नका
चुकीच्या नंबरवर मोबाईल रिचार्ज केला, तरीही घाबरू नका

काही वर्षांपूर्वी मोबाईलचा रिचार्ज करण्यासाठी एखाद्या दुकानात जायला लागायचे. तिथे जायचे, रांगेत उभे राहायचे आणि त्यानंतर कुठे रिचार्ज व्हायचा. आता हे चित्र बदलले आहे. आता कंपनीच्या अ‍ॅप किंवा संकेतस्थळाला भेट दिली तर घरबसल्या रिचार्ज करता येतो. पण एखाद वेळेस नजर चुकीमुळे जर भलत्याच नंबरचा रिचार्ज झाला तर काय करायचे? त्यामुळे तुमचे पैसे फुकट जाणार का? याच प्रश्नांचे उत्तर शोधूया.

ते पळून जाणार नाही…

२०-२५ रुपयांचा रिचार्ज करण्याचे दिवस कधीच गेले आहेत. आता आपण जे रिचार्ज करतो ते सामान्यपणे ५००-६००च्या पुढे असतात. इतके महागडे रिचार्ज चुकीच्या नंबरला गेले तर अतिशय वाईट वाटते. पण यापुढे चिंता करू नका. कारण चुकीच्या नंबरवर रिचार्ज केला गेला तरीही तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.

पहिली पायरी

चुकीच्या नंबरवर रिचार्ज केला गेल्यास तात्काळ तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या कस्टमर केअरला कॉल करा. त्यांना कॉलवर प्रामाणिकपणे सर्व माहिती द्या. जसे की कोणत्या अॅपवरून रिचार्ज केला, किती दिवसांसाठी रिचार्ज केला, किती रुपयांचा रिचार्ज केला इत्यादी. या संभाषणानंतर तुमचे सर्व तपशील टेलिकॉम ऑपरेटरच्या मेलवर पाठवा. भारतातील बहुतांश वापरकर्ते जिओ, एअरटेल, व्हीआयचा वापर करतात. त्या कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर आणि मेल आयडी पुढीलप्रमाणे –

जिओ –
१८००८८९९९९९
[email protected]

एअरटेल-
(०२०) ४४४४४१२१
[email protected]

व्हीआय –
१९९
[email protected]

एक किंवा दोन आकड्यामुळे रिचार्ज चुकीच्या नंबरवर गेला असेल तर पैसे मिळण्याची अधिक शक्यता आहे. जर संपूर्ण आकडा वेगळा असेल तर कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करेल. कारण काही माणसे मुद्दामून कंपनीला त्रास देण्यासाठी असे करतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.