मुंबई शहरात म्हाडाच्या १५ इमारती अतिधोकादायक

176
मुंबई शहरात म्हाडाच्या १५ इमारती अतिधोकादायक
मुंबई शहरात म्हाडाच्या १५ इमारती अतिधोकादायक

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात आले असून यात यावर्षी १५ इमारती अतिधोकादायक असल्याच्या आढळून आल्या आहेत.

यंदाच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या १५ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये मागील वर्षी जाहीर केलेल्या ७ इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४२४ निवासी व १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी/भाडेकरू आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही नुसार १५५ निवासी भाडेकरू/रहिवाशांनी स्वतःची निवर्‍याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत २१ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरू/रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच २२२ निवासी भाडेकरू/रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे. मंडळातर्फे संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

(हेही वाचा – J J hospital : जे. जे. रुग्णालयाच्या अंतर्गत राजकारणात रुग्णांची होतेय हेळसांड)

मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष
रजनी महल, पहिला मजला, ८९-९५,ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४. दूरध्वनी क्रमांक – २३५३६९४५, २३५१७४२३. भ्रमणध्वनी क्रमांक – ९३२१६३७६९९

मुंबई महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष
पालिका मुख्यालय, फोर्ट, मुंबई.दूरध्वनी क्रमांक २२६९४७२५/२७

मुंबई शहरातील ‘या’ आहेत १५ अतिधोकादायक इमारती..

१) इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)
२) इमारत क्रमांक ७४ निझाम स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
३) इमारत क्रमांक ४२, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
४) इमारत क्रमांक ६१-६१ए , मस्जिद स्ट्रीट
५) इमारत क्रमांक २१२ जे पांजरपोळ लेन
६)इमारत क्रमांक १७३-१७५-१७९ व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी
७)इमारत क्रमांक २-४-६ नानुभाई देसाई रोड, मुंबई
८) इमारत क्रमांक १-२३ नानुभाई देसाई रोड, मुंबई
९) इमारत क्रमांक ३५१ ए, जे एस एस रोड मुंबई
१०)इमारत क्रमांक ३८७-३९१ बदामवाडी, व्ही .पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
११) इमारत क्रमांक १७ नारायण निवास , निकटवाडी
१२)इमारत क्रमांक ३१सी व ३३ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगावचौपाटी ( मागील वर्षीच्या यादीतील)
१३)इमारत क्रमांक १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग ( मागील वर्षीच्या यादीतील)
१४)इमारत क्रमांक ४० कामाठीपुरा ४थी गल्ली
१५)अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस – ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.