Sharad Pawar : शरद पवार वर्षा बंगल्यावर; चर्चेला उधाण

या भेटीत त्यांनी नेमके कोणत्या विषयावर चर्चा केली याची माहिती अद्याप नाही.

165

सध्या राज्यात जलद गतीने राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात अनिश्चिततेचे राजकारण पाहता कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबईतील वर्षा या निवासस्थानी पोहोचले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी नेमके कोणत्या विषयावर चर्चा केली याची माहिती अद्याप नाही. मात्र, शरद पवार काही कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आणि या आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. त्यामुळे, शरद पवारांची ही भेट कामानिमित्त असली तर याची राजकीय चर्चा राज्याच्या वर्तुळात होत आहे. या भेटीची अनेक पैलूंनी चर्चा केली जात आहे.

(हेही वाचा Rahul Gandhi : वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात जारी होणार समन्स?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.