स्वतःच्या अपहरणचा कट रचून वडिलांकडून पाच लाख रुपये उकळण्याचा मुलाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे, गोरेगाव पश्चिम येथे घडलेल्या या अपहरणनाट्य प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी मुलाविरुद्ध अपहरणाचा बनाव करून वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुलाला अटक करण्यात आली आहे.
जितेंद्र दिनेशलाल जोशी (२७) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. दहिसर पूर्व वैशाली नगर, घरटन पाडा येथे राहणारे दुधाचे व्यापारी दिनेशलाल जोशी (४८) हे मोठा मुलगा जितेंद्र, सून, नातू लहान मुलगा विकास सोबत राहण्यास आहे. जितेंद्र हा गोरेगाव पश्चिम येथील डी-मार्ट स्टोर्समध्ये मॅनेजर या पदावर आहे. मंगळवारी दुपारी जितेंद्र कामावर गेल्यानंतर रात्री ११ वाजता तो कामावरून सुटतो, मात्र रात्री उशीर होऊन देखील जितेंद्र घरी न आल्यामुळे चिंतेत असलेल्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला असता त्याचा मोबाईल फोन बंद होता. जितेंद्रचे कुटुंब त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या सहकारी यांना कॉल करून चौकशी करीत असता मध्यरात्री २ वाजता जितेंद्रच्या मोबाईल वरून त्याची पत्नी हिच्या व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ आला, त्यांनी तो व्हिडीओ बघितला जितेंद्रचे हातपाय तोंड डोळे बांधून एका खोलीत खोवून ठेवले होते.
(हेही वाचा – Railway : रेल्वेमधून ५९ अल्पवयीन मुलांची तस्करी; मुसलमानांना अटक केली)
काही वेळाने जितेंद्रच्या मोबाईल वरून पत्नीच्या व्हॉट्सअॅपवर कॉल आला व कॉल करणाऱ्याने ‘तुम्हारा बेटा मेरे कब्जे मे है, अगर बेटा चाहते हो तो ५ लाख रुपये लेकर ओबोरॉय मॉल के पास सुबह ७ बजे लेके आना, पुलिस को इन्फोम किया तो बेटे के जान के जिम्मेदार तुम होगे, या आशयाची धमकी दिली.’ घाबरलेल्या जोशी कुटुंबीयांनी गोरेगाव डी मार्ट येथे धाव घेऊन जितेंद्र कामाला आला होता का? याचा तपास करून गेटवरील सीसीटीव्ही तपासले असता रात्री ११ वाजता जितेंद्र बाहेर पडताना दिसून आला त्याच्या सोबत डी-मार्टमध्ये काम करणारा कर्मचारी सोबत होता. जोशी कुटुंबीयांनी तात्काळ बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली, पोलिसांनी गुन्हा अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासून एका ठिकाणाहून जितेंद्रची सुटका केली, व त्याच्याकडे अपहरणकर्त्या बाबत चौकशी केली असता त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एकाच्या मदतीने त्याने स्वतःचे अपहरण करण्याची योजना ४ दिवसापूर्वी आखली होती. त्या कर्मचाऱ्याने त्याला मदत करण्यास नकार दिला असता जितेंद्रने त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. व त्या कर्मचाऱ्याच्या मदतीने स्वतःचे अपहरण करून वडिलांकडे ५ लाखाची मागणी केली असल्याची कबुली जितेंद्रने पोलिसांना दिली. वडिलांकडून पैसे लाटण्यासाठी त्याने स्वतःचे अपहरणाचा कट आखून वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून जितेंद्र जोशी याला याप्रकरणी अटक केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community