Love Jihad : धर्मांतर करून लग्न कर नाहीतर तुझी साक्षी करेन म्हणणा-या मंहमदला लाथा बुक्क्यांनी तुडवले

आसिफच्या धमक्यांना मुलगी इतकी घाबरली होती की तिने पोलिस ठाण्यात जाऊन तिला वाचवण्याची वारंवार विनंती केली.

244

दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात साक्षीची हत्या होऊन आठवडाही झालेला नाही तोच राजस्थानमधील उदयपूरमध्ये मोहम्मद आसिफ भुट्टो नावाच्या व्यक्तीने एका मुलीला धर्मांतर न केल्यास तिची साक्षीसारखी अवस्था करण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. जिथे कोर्टाबाहेर उपस्थित लोकांनी आरोपीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हे प्रकरण उदयपूरच्या अंबामाता पोलीस ठाणे क्षेत्राशी संबंधित आहे. मोहम्मद आसिफ भुट्टोसोबत तिची मैत्री असल्याचे पीडित मुलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मैत्री संपुष्टात आणण्याचे बोलताच त्याने तिच्यावर धर्मांतर करून लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तसेच त्याने मुलीला अनेकवेळा मारहाण केली. आसिफविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तुरुंगातही गेला असल्याचा दावा तरुणीने केला आहे. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा अडचणीत आला आहे.

(हेही वाचा Love Jihad : पुण्यात धर्मांध मुसलमानाने अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केले ४ वर्षे लैंगिक अत्याचार)

या संपूर्ण प्रकरणात मोहम्मद आसिफ भुट्टोचे वडील आणि त्यांचा भाऊही सहभागी असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. या दोघांमधील संभाषण पीडितेने आसिफचे वडील अब्दुल यांना सांगितल्यावर त्यांनी आसिफला तिच्याशी लग्न कर, नाहीतर तिची हत्या करू, असे सांगितले होते. मात्र, मुलगी धर्मांतर करण्यास राजी न झाल्याने बुधवारी, 31 मे 2023 आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेचा आरोप आहे की मोहम्मद आसिफ भुट्टोने तिला सांगितले की, तो तिचे तुकडे करून तिला तिच्या आईला देईल. आसिफच्या धमक्यांनी घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

आसिफच्या धमक्यांना मुलगी इतकी घाबरली होती की तिने पोलिस ठाण्यात जाऊन तिला वाचवण्याची वारंवार विनंती केली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 387, 330 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यानंतर, गुरुवारी, 1 जून 2023 रोजी पोलिसांनी त्याला उदयपूर न्यायालयात हजर करण्यासाठी नेले. आसिफला पाहताच वकिलांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर संतप्त जमावाने त्यांना बेदम मारहाण केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.