Maharashtra SSC Result: दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांची घट

173
Maharashtra SSC Result: दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांची घट
Maharashtra SSC Result: दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांची घट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या वर्षी सुद्धा दहावीची परीक्षा घेण्यात आली. २ जून २०२३ला दुपारी एक वाजता परीक्षेचा निकाल जाहिर होणार आहे. या निकालाकडे परीक्षेला बसलेल्या लाखो मुलांचे लक्ष लागून राहिले आहे. २०२२-२०२३च्या शैक्षणिक वर्षांत २३ हजार १३ माध्यमिक शाळांमधून १५ लाख ७९ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ६ हजार ८४४ शाळांचा निकाल १००% लागला. कला, क्रीडा, एनसीसी, स्काऊट गाईड, चित्रकला, लोककला यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहे. २०१६ पासून असे वाढीव गुण देण्याची पद्धत सुरू झाली होती.

‘या’पेक्षा २०२० बरे

मागच्या चार वर्षांच्या निकालाची तुलना केली असता हे लक्षात येते की सर्वांत कमी निकाल २०२३ ला लागला आहे. २०२३ मध्ये ज्या प्रकारे परीक्षा घेण्यात आली होती त्याच प्रकारे २०२० मध्ये देखील घेण्यात आली होती. मात्र २०२० चा निकाल ९५.३० आहे तर २०२३ चा निकाल ९३.८३ आहे. २०२० च्या तुलनेत २०२३ मध्ये दहावीचा निकाल ३.११% घटला.

२०२० -९५.३०%
२०२१ – ९९.९५%
२०२२ – ९६.९४%
२०२३ – ९३.८३%

विजय पताका ‘ति’च्यात हाती

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. ९५.८७% मुली पास झाल्या आहेत तर ९२.०५% मुले पास झाली आहेत. मुली आणि मुलांच्या सामायिक यशात ३.८२% चा फरक आहे.

नॉट आऊट २५

राज्याच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ६७ विषय होते. त्यापैकी फक्त २५ विषयांचा निकाल १००% लागला.

विभागीय निकाल

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाने प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे तर सर्वांत शेवटचे स्थान नागपूर विभागाच्या पदरात पडले आहे.

  • कोकण: ९८.११ टक्के
  • कोल्हापूर: ९६.७३ टक्के
  • पुणे: ९५.६४ टक्के
  • मुंबई: ९३.६६ टक्के
  • औरंगाबाद: ९३.२३ टक्के
  • अमरावती: ९३.२२ टक्के
  • लातूर: ९२.६७ टक्के
  • नाशिक: ९२.२२ टक्के
  • नागपूर: ९२.०५ टक्के

पुनर्परीक्षा

किती विद्यार्थ्यांनी नोंद केली – ३७, ७०४
किती विद्यार्थी परीक्षेला बसले – ३६, ६४८
किती विद्यार्थी पास झाले – २०,३२०
किती टक्के पास – ६०.९०

१७ नंबर

किती विद्यार्थ्यांनी नोंद केली – २१,२१६
किती विद्यार्थी परीक्षेला बसले – २०,५७४
किती विद्यार्थी पास झाले – १५,२७७
किती टक्के पास – ७४.२५

दिव्यांग विद्यार्थी

किती विद्यार्थ्यांनी नोंद केली – ८,३९७
किती विद्यार्थी परीक्षेला बसले – ८,३१२
किती विद्यार्थी पास झाले – ७,६७८
किती टक्के पास – ९२.४९ टक्के
परीक्षेला बसणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले होते.

(हेही वाचा – BMC : पश्चिम उपनगरातील ‘या’ भागात रविवारी पाण्याचा वापर जपून करा; नाहीतर…)

मोबाईल, पेढे की मार?

दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले पाहिजे असे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच जास्त वाटते. त्यामुळे निकाल कळल्यावर कोणाला तरी मोबाईल मिळणार आहे तर कोणी मार खाणार आहे.

४ लाख ८९ हजार ४५५- विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली
५ लाख २६ हजार २१० – प्रथम श्रेणी प्राप्त केली
३ लाख ३४ हजार १५ – द्वितीय श्रेणी प्राप्त केली
८५ हजार २९८ – पास झाले

उत्सुकतेला पूर्णविराम इथे मिळणार

ज्यांनी परीक्षा दिली ते तर निकालच्या प्रतीक्षेत आहेतच पण ज्यांनी परीक्षा दिली नाही ते सुद्धा आतुरतेने निकालाची वाट पाहात आहेत. निकाल पाहाण्यासाठी या पैकी कोणत्याही संकेत स्थळाला भेट द्या

  • www.mahresult.nic.in
  • http://sscresult.mkcl.org
  • https://ssc.mahresults.org.in
  • www.mahresult.nic.in

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.