छोटा राजनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, ‘ती’ वेबसीरिज प्रदर्शित होणारच

227
छोटा राजनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, 'ती' वेबसीरिज प्रदर्शित होणारच
छोटा राजनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, 'ती' वेबसीरिज प्रदर्शित होणारच

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याने २ जूनला मुंबई उच्च न्यायालयात धावत घेत नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध होणाऱ्या एका वेबसीरिजच्या विरोधात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने छोटा राजनची बाजू ऐकली आणि त्यालाच दणका देत त्याची मागणी फेटाळून लावली.

वेबसीरिजचा राजनशी संबंध काय?

उच्च न्यायालयाने या वेबसीरिजच्या प्रदर्शनावर बंदी आणावी अशी छोटा राजनची मागणी होती. पण न्यायालयाने हे प्रदर्शन रोखण्यास नकार दिला आहे. या वेबसीरिजमुळे माझ्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन झाले असे म्हणत राजनने आपली बाजू मांडली होती.

पराक्रमी वेबसीरिज

नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या या वेबसीरिजचे नाव स्कूप असे आहे. ही वेबसीरिज जिग्ना व्होरा यांच्या कथेवर आधारित आहे. हंसल मेहता दिग्दर्शित स्कूप ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

(हेही वाचा – Robbery : सायनमध्ये २ कोटींचा दरोडा; दिल्ली क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून लुटले)

न्यायालय काय म्हणाले?

न्यायालयाने छोटा राजनला दिलासा दिला नाही. वेबसीरिजचे प्रक्षेपण तर होणारच आहे. मात्र संबंधित फिल्म निर्माता आणि इतर सर्वांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. त्यांनी आपले उत्तर लवकरात लवकर न्यायालयात दाखल करावे असा निर्देश संबंधित लोकांना देण्यात आले आहेत.

पूर्णविराम की स्वल्पविराम

तूर्त जरी न्यायालयाने वेबसीरिजवर बंदी घातली नसली तरीही हा खटला इथेच थांबलेला नाही. यावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जून २०२३ ला होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.