Shri Ram Mandir : …अयोध्या सजणार, सात दिवस सोहळा रंगणार; मोदींच्या हस्ते श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याची शक्यता

रामसेवकपुरममध्ये कर्नाटकातील म्हैसूरच्या 2 दगडांना आकार दिला जात आहे, तर समोरच्या आवारात राजस्थानच्या संगमरवरी दगडाला आकार दिला जात आहे.

249

समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. हा सोहळा अयोध्या येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रसंगी सात दिवस हा सोहळा साजरा होणार असून देशातील असंख्य संत अयोध्यामध्ये उपस्थित राहणार आहेत.

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी रामललाच्या 3 मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रामलल्लाच्या डोक्यावर मुकुट व हातात धनुष्यबाण असेल. त्यासाठी कर्नाटकातील 2 काळे दगड आणि राजस्थानचे पांढरे संगमरवर वापरले जात आहेत. मात्र, यापैकी कोणती मूर्ती गर्भगृहासाठी निवडली जाईल, हे अद्याप निश्चित झाले नाही. देशभरात 7 दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी संत-धर्माचार्यांना आवाहन करण्यात येणार आहे. त्यांना आपापल्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरी करण्याची विनंती केली जाईल. रविवारी दगडांची पूजा करण्यात आली. शिल्पकार कामाला लागले आहेत. या मूर्ती 51 इंच उंच करायच्या आहेत. मूर्ती स्थापित केल्यानंतर त्यांची उंची 8 फूट असू शकते.

(हेही वाचा Maharashtra Military School : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला)

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्री राम मंदिरात येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट प्राणप्रतिष्ठेचा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करणार आहे. या सोहळ्याची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. या प्रकरणी जाणकारांशी चर्चा सुरू असल्याची माहिती ट्रस्टच्या बैठकीनंतर सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. मंदिराचा तळमजला व गर्भगृहाचे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची तयारी केली जाईल. पंतप्रधानांना डिसेंबर ते 26 जानेवारी 2024 पर्यंतच्या कार्यक्रमाची संभाव्य तारीख सांगितली जाईल.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका तयार करतील. त्यावर महंत नृत्य गोपाल दास स्वाक्षरी करणार आहेत. ती पत्रिका पंतप्रधानांकडे पाठवली जाईल. राम मंदिराचा तळमजला मकरानाच्या संगमरवराने सजवला जाईल. जमिनीवर मार्बल टाकण्याचे काम एक-दोन दिवसांत सुरू होईल. राम मंदिराच्या गर्भगृहात कोरीव दगड बसवले जाणार आहेत. देशभरात 7 दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी संत-धर्माचार्यांना आवाहन करण्यात येणार आहे. त्यांना आपापल्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरी करण्याची विनंती केली जाईल. या मूर्ती तयार होण्यासाठी सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. रामसेवकपुरममध्ये कर्नाटकातील म्हैसूरच्या 2 दगडांना आकार दिला जात आहे, तर समोरच्या आवारात राजस्थानच्या संगमरवरी दगडाला आकार दिला जात आहे. कर्नाटकातील कारागीर गणेश एल. भट्ट व राजस्थानचे कारागीर सत्यनारायण पांडे यांच्या नेतृत्वात हे काम सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.