मुंबईतील मालवणी (मालाड पश्चिम) परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांच्या बांधकामांवर राज्य सरकारने शुक्रवारी बुलडोझर फिरवला. या कारवाईअंतर्गत ४७६ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. त्यामुळे ६ हजार मीटर जमीन मोकळी झाल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
बांग्लादेशी घुसखोरांच्या बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या सोबत पालकमंत्री लोढा यांनी बैठक आयोजित केली होती. मुंबई उपनगरातील ज्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे, ती अतिक्रमण मुक्त करण्याचे निर्देश यावेळी लोढा यांनी दिले होते. त्यानुसार मालवणी परिसरात अवैधपणे राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांच्या अवैध बांधकामांचे पाडकाम करण्यात आले आहे. ६ हजार मीटर जमीन या ठिकाणी अनधिकृत बांधकाम मुक्त करण्यात आली आहे. आता याठिकाणी देशी खेळांचे मैदान तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात बुलडोझर पॅटर्न
जे अनधिकृत कामे करतात, त्यांच्यासाठी सरकारने बुलडोझर पॅटर्न आणला आहे. बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात विशेष करून ही कारवाई होत असून, सरकारी जमिनीवर अनधिकृतपणे राहणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबविली जात असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी बोलताना दिली.
Join Our WhatsApp Community