Manipur Violence : हळूहळू स्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता; नागरिकांकडून १४० पेक्षा जास्त शस्त्रास्त्रांचं समर्पण

मणिपूर (Manipur Violence) राज्यात ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून एकूण ४०१४ जाळपोळीच्या घटना घडल्याची माहितीही सरकारने दिली आहे.

188
Manipur Violence : हळूहळू स्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता; नागरिकांकडून १४० पेक्षा जास्त शस्त्रास्त्रांचं समर्पण

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील तणावाची स्थिती (Manipur Violence) कायम आहे. अशातच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा विविध भागात विद्रोही गट आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, रविवारी (२८ मे ) पहाटे, दोन वाजता इम्फाल घाटीत आणि तिथल्या आजूबाजूच्या पाच भागांमध्ये एकत्र हल्ला झाला. यादरम्यान आता मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेश सिंह यांनी राज्यात ४० दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे. शिवाय काही दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने अटक केली आहे. ही कारवाई दहशतवादी गटांविरुद्ध प्रति आणि बचावात्मक कारवाईचा भाग म्हणून करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुकी समुदायाच्या नेत्यांशी शांतता प्रस्थापित करण्याबद्दल चर्चा केली होती.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरसाठी अमित शाह यांनी शोधला ‘हा’ रामबाण उपाय)

अशातच आता मणिपूर हिंसाचारानंतर (Manipur Violence) आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आवाहनाचा परिणाम दिसून येत आहे. तेथील लोकांनी १४० पेक्षा जास्त शस्त्रे परत केली आहेत. मणिपूर सरकारने २ जून रोजी जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, “हिंसाचारातील मृत्यूंची संख्या ९८ आहे आणि जखमींची संख्या ३१० आहे.” गेल्या एका महिन्यात, राज्य पोलिसांनी ३७३४ गुन्हे दाखल केले आहेत आणि हिंसाचारात सहभागी असल्याबद्दल ६५ लोकांना अटक केली आहे, असंही निवेदनात सांगितलं आहे.

मणिपूर (Manipur Violence) राज्यात ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून एकूण ४०१४ जाळपोळीच्या घटना घडल्याची माहितीही सरकारने दिली आहे. सरकारने लोकांना हिसकावलेली शस्त्रे आणि दारूगोळा आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे. सरकारने निवेदन जारी करत म्हटलं आहे की, “कोणत्याही व्यक्तीला हिसकावून घेतलेली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह पकडले गेल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” आतापर्यंत, सुरक्षा यंत्रणांनी १४४ शस्त्रे जप्त केली आहेत.

हेही पहा – 

अमित शाहांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या महिन्यात सुरू झालेला हिंसाचार आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानंतर लोकांनी मणिपूरच्या विविध ठिकाणांहून शेकडो शस्त्रे परत केली आहेत. शाह यांनी मणिपूर दौऱ्यात शस्त्रे समर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राज्यतील नागरिकांनी विविध ठिकाणांहून १४० पेक्षा अधिक शस्त्र पोलिसांकडे सुपूर्त केली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.