आशियामध्ये भारतीय ज्युनियर हॉकी (Junior Mens Asia Cup Hockey 2023) संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय ज्यूनियर पुरुष हॉकी टीमने गुरुवार १ जून रोजी झालेल्या ज्यूनियर एशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. आठ वर्षानंतर झालेल्या या टूर्नामेंटला पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते. पाकिस्तानचा पराभव करत भारताने एशिया कपवर (Junior Mens Asia Cup Hockey 2023) आपलं नाव कोरलं आहे.
(हेही वाचा – TATAला आयसीआयसीआय बँकेची मदत; नवीन कर्करोग रुग्णालयासाठी बँकेने दिली ‘इतकी’ रक्कम)
टीम इंडियाने चौथ्यांदा हॉकी ज्युनियर एशिया कप (Junior Mens Asia Cup Hockey 2023) वर नाव कोरलं आहे. ज्युनियर एशिया कप हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला. भारतीय हॉकी संघाने विजेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. हा सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे.
टीम इंडिया विश्वकपसाठी पात्र
गुरुवारी, 1 जून रोजी झालेल्या ज्युनियर एशिया चषक हॉकी (Junior Mens Asia Cup Hockey 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने 2-1 असा दणदणीत विजय मिळवला. हॉकी ज्युनियर एशिया कप जिंकणारा भारतीय संघ आता मलेशियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या (FIH) पुरुष ज्युनियर विश्वचषकासाठीही पात्र ठरला आहे.
हेही पहा –
8 वर्षांनंतर ज्युनियर एशिया कपचं आयोजन
यंदा तब्बल आठ वर्षानंतर ज्युनियर एशिया कपचं (Junior Mens Asia Cup Hockey 2023) आयोजन करण्यात आलं होतं. 2015 मध्ये शेवटचा ज्युनियर आशिया कप खेळवण्यात आला होता, त्यावेळीही भारत विजेता होता. भारताने आतापर्यंत 2004, 2008 आणि 2015 मध्ये आशिया कप हॉकीचे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आता भारताने विक्रमी चौथ्यांदा ही कामगिरी केली आहे. पाकिस्तानने 1987, 1992 आणि 1996 अशी तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
Join Our WhatsApp Community