सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगून तामिळनाडू राज्यातील एका हिरे व्यापाऱ्याला मुंबई विमनातळावर लुटण्यात (Robbed) आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी या टोळीतील एका महिलेला अटक केली असून तीचे इतर साथीदार हिरे व्यापाऱ्याच्या बॅगेसह फरार झाले आहे. या बॅगेत व्यापाऱ्याचे २६ लाख रुपये किमतीचे परदेशी चलन आणि इतर कागदपत्रे होती.
सौरभ सज्जाद हुसैन (३२) (Robbed) असे तक्रारदार हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. सौरभ हुसैन हे तामिळनाडू राज्यातील राहणारे आहेत. हुसैन यांचा मौल्यवान खडे आणि हिऱ्यांचा व्यवसाय असून ते प्रत्येक राज्यात मौल्यवान राशीचे खडे आणि हिऱ्याचा व्यापार करण्यासाठी जात असतात. काही दिवसांपूर्वी ते कर्नाटक येथे खड्यांची डिलीव्हरी देऊन मुंबईत आले होते. मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबलेले हुसैन यांच्या दोन मैत्रिणी दुबई येथे जाणार आल्यामुळे ते त्या मैत्रिणींना भेटायला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते, येताना त्यांच्या सोबत असलेल्या बॅगेत २५हजार अमेरिकन डॉलर आणि २५ हजार युएई दिरहम होते.
(हेही वाचा – Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा दौऱ्यावर)
रात्री ते विमानतळावर मैत्रिणीची वाट पहात असताना दोन अनोळखी पुरुषआणि एक महिला त्यांच्याकडे आली, व त्यांनी स्वतःची ओळख सीमाशुल्क अधिकरी असल्याचे सांगून तुमच्याकडे चौकशी करायची आहे, असे सांगून हुसैन यांना विमानतळा जवळील बागेत घेऊन आले. त्यानंतर त्यांच्याकडे परकीय चलन (Robbed) असल्याचे समजताच एका व्यक्तीने बॅग स्कॅन करण्याच्या निमित्ताने ती बॅग घेतली आणि दोन व्यक्ती हुसैन यांच्यासोबतच थांबल्या.
काही वेळाने कारण काढून ते दोघे जण तेथून निसटण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या अशा वागण्यामुळे हुसैन यांना त्यांच्यावर संशय आला. मग त्यांनी या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता महिलेला पकडण्यात त्यांना यश आले; मात्र महिलेसोबत असलेला पुरुष हा तेथून निसटला. त्यानंतर हुसैन यांनी या महिले विरुद्ध सहार पोलिस ठाण्यात (Robbed) तक्रार केली.
हेही पहा –
सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली. चौकशीदरम्यान (Robbed) त्या महिलेचे नाव सलमा बानू असे असून ती कर्नाटक राज्यात राहणारी आहे अशी माहिती समोर आली. सलमा बानू आणि तिचे दोन सहकारी हुसैन यांचा कर्नाटक पासून पाठलाग करीत मुंबईत आले होते. सध्या पोलिस तिच्या दोन साथीदारांचा कसून शोध घेत आहेत.
Join Our WhatsApp Community