Odisha Train Accident : जखमी प्रवाशांना मदत देणे आमची प्राथमिकता; अश्विनी वैष्णव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही

बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अजूनही मदतकार्य सुरू आहे.

139
Odisha Train Accident : जखमी प्रवाशांना मदत देणे आमची प्राथमिकता; अश्विनी वैष्णव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही

बालासोर रेल्वे अपघातातील (Odisha Train Accident) जखमींना मदत पोहचविणे ही आमची प्राथमिकता असल्याचे मत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केले आहे. विरोधी पक्षांनी रेल्वे मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. या मुद्यावर बोलताना वैष्णव यांनी सरकारची प्राथमिकता सांगितली.

बालासोर रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) २८८ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात अद्ययावत सुरक्षा यंत्रणा असताना एवढा मोठा अपघात झालाच कसा? असा प्रश्न उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा (Odisha Train Accident) आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहचले असतांना, ‘विरोधक तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

(हेही वाचा – ओडिशाच्या रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…)

त्यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, ” या प्रकारच्या घटनेत मानवी संवेदनशीलता खूप महत्त्वाची आहे. मी म्हणेन की प्रथम आपण बचाव (Odisha Train Accident) आणि मदत कार्यावर लक्ष देऊया. ही मोठी घटना आहे. या अपघातामागे षडयंत्र असू शकते का, असे विचारले असता, संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतरच याबाबत काही सांगता येईल.” असे म्हंटले आहे.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, अपघाताच्या चौकशीसाठी (Odisha Train Accident) एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, जी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. सध्या संपूर्ण लक्ष बचावावर आहे. जखमींवर चांगल्या उपचारासाठी पथके जमा झाली आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनाही अपघाताची चौकशी करण्यास सांगितले आहे.

हेही पहा – 

बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अजूनही मदतकार्य सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही घटनास्थळी पोहोचले असून सर्व अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.