खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर नाशिकमध्ये शिंदे गटाच्या वतीने संजय राऊत यांच्या ताफ्या पुढे जोरदार घोषणाबाजी करून राऊत यांच्या निषेध व्यक्त करण्यात आला. यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
(हेही वाचा – ओडिशाच्या रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…)
माहितीनुसार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला गेले होते. इथला कार्यक्रम संपवून राऊत शासकीय विश्रामगृह येथे जेवणासाठी जात असताना शिंदे गटाचे कार्यालय असलेल्या मायको सर्कल येथील रस्त्याने जाणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. ज्यावेळी संजय राऊत यांचा ताफा कार्यालयासमोरून जात होता त्यावेळी त्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ताफ्यासमोर येण्यापासून थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान पुणे, ठाणे येथेही संजय राऊतांच्या फोटो जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पुणे शहर शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने शनिवारी गुडलक चौक येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
Join Our WhatsApp Community