वरळी कोळीवाड्याला मोठ्या प्रमाणात झोपड्यांचा विळखा बसलेला असून या झोपड्यांमुळे वांद्रे-वरळी सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना बकाल दृश्य दिसत असते. त्यामुळे या पुलावरून जाताना प्रत्येक व्यक्तीला नेत्रसुखद अनुभव घेता यावा म्हणून कोळीवाड्यातील झोपड्यांच्या भिंती आणि छतांवर रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
वरळी किल्ल्याच्या जिर्णोध्दार व सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे भविष्यात या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढू शकतो. या किल्ल्या शेजारीच वरळी कोळीवाडा असून जवळून वांद्रे-वरळी सी लिंक मार्गाशेजारीच कोळीवाडा असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मुंबईकर जनता तसेच भारतातील पर्यटकांसह परदेशी पर्यटक प्रवास करत असल्याने वरळी कोळीवाडा परिसरातील या झोपड्यांमुळे बकालपणा दृष्टीस पडत असतो. एकाबाजुला मुंबईचे सौंदर्यीकरण करताना रस्ते,पदपथ तसेच सर्व विभाग सुशोभित केले जात असताना दुसरीकडे मुंबई शहरात प्रवेश करताना पर्यटकांच्या दृष्टीस हा बकालपणा पडत असल्याने महापालिका प्रशासनाने सौंदर्यीकरणाअंतर्गत येथील झोपड्यांच्या भिंतीसह छतांची रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – BMC : महानगरपालिकेच्या शाळांचा निकाल ८४.७७ टक्के; गुंदवली शाळेचा शुभम सिंगने मिळवले ९५. २० टक्के)
यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून यासाठी विविध करांसह तब्बल पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी एन.के.शहा इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये या रंगरंगोटीचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वरळी कोळीवाड्यातील वस्तू असलेल्या घरांच्या भिंती आणि छतांवर एरियल व्हयू केल्याने वांद्रे वरळी सी लिंकवरून प्रवास करताना या परिसराचे विहंगमय दृश्य अनुभवता येईल तसेच स्थानिक नागरिकांना तथा रहिवाशांना आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल,असेही त्यांनी म्हटले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community