अनिल डिग्गीकर सिडकोत, मुखर्जी एमएमआरडीएत

286
अनिल डिग्गीकर सिडकोत, मुखर्जी एमएमआरडीएत
अनिल डिग्गीकर सिडकोत, मुखर्जी एमएमआरडीएत

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या जागी संजीव जयस्वाल यांची बदली झाल्यानंतर डिग्गीकर यांची नियुक्ती सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची नियुक्ती एमएमआरडीएच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

शुक्रवारी २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर शनिवारी आणखी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांची बदली नगरविकास खात्यात करण्यात आली होती, परंतु ही बदली एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्यामुळे दोनच दिवसांमध्ये त्यांची पुन्हा बदली झाली आहे. तर अतिरिक्त महानगर आयुक्त असलेल्या डॉ एच के गोविंद राज यांची बदली नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. तर अतिरिक्त मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार व सामान्य प्रशासन विभागाचा भार सांभाळणार मनिषा म्हैसकर यांच्याकडे या विभागांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

(हेही वाचा – महापालिका प्रशासन म्हणतंय, मुंबई शहरातील ‘या’ भागांत तुंबणार नाही पाणी!)

संजय मुखर्जी यांनी यापूर्वी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम सांभाळले असून त्यांनी सिडकोमध्ये योग्यप्रकारे कामाची चुणूक दाखवून अनेक प्रकल्पांना गती देत घरांची लॉटरी काढत सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय कोविड काळात मुंबई महापालिकेलाही कोविड सेंटरची उभारणी करून देत सहकार्य केले होते. तसेच सिडकोच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांना गती देत ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी पुढाकार घेतला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.