महाराष्ट्र सरकारने रिक्षाचालकांसाठी राबविलेल्या योजनांपासून प्रभावित होत दिल्लीतील रिक्षाचालकांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. केंद्र सरकारने सुध्दा दिल्लीतील रिक्षाचालकांसाठी महाराष्ट्रासारखी सामाजिक सुरक्षा योजना राबवावी, अशी अपेक्षा यावेळी रिक्षाचालकांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष कर्नल (से) देवेंद्र सेहरावत यांनी यावेळी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिक्षाचालकांसोबत विश्वासघात केला आहे. केजरीवाल यांना सत्ता मिळवून देण्यात रिक्षाचालकांनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र, सत्ता मिळताच केजरीवाल यांनी त्यांचा विसर पडला.
(हेही वाचा – अनिल डिग्गीकर सिडकोत, मुखर्जी एमएमआरडीएत)
केजरीवाल यांच्यापासून मोहभंग झाल्यामुळे दिल्लीतील रिक्षाचालक, फेरीवाले आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असल्याचे सेहरावत यांनी सांगितले. यावेळी अंशमुन जोशी, रिक्षाचालक संघटनेचे महासचिव राजेंद्र सोनी उपस्थित होते. दिल्लीचे प्रभारी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्हच्र्युअल पध्दतीने उपस्थितांना संबोधित केले.
महाराष्ट्र सरकारने रिक्षाचालकांसाठी सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा केली आहे. अशीच योजना केंद्र सरकारने दिल्लीतील रिक्षाचालकांसाठी राबवावी अशी आमची मागणी आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे राजेंद्र सोनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community