हिरकणी बस आता नव्या रूपात

222
हिरकणी बस आता नव्या रूपात
हिरकणी बस आता नव्या रूपात

हिरव्या आणि पांढऱ्या रंगातील हिरकणी बस सर्वांना माहिती आहे, पण तिची ही ओळख आता कालबाह्य होणार आहे. कारण, एसटी प्रशासनाने हिरकणीच्या रंगासह प्रवासी सुविधेत मोठा बदल केला आहे. उद्घोषणेपासून पॅनिक बटणपर्यंत सर्वप्रकारची सुविधा प्रवाशांना नव्या हिरकणीत मिळणार आहे. विशेष म्हणजे बसची आसनक्षमताही वाढवली आहे.

(हेही वाचा – Goa Mumbai Vande Bharat Train : गोवा-मुंबई वंदे भारत लोकार्पणाचा सोहळा रद्द)

एसटी महामंडळाच्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत दोनशे हिरकणींची बांधणी सुरू असून, दोन महिन्यांत त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. लालपरीसह हिरकणीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात हे लक्षात घेऊन आवश्यक बदल केला आहे. यात सरकते, आतून उघडणारे व बंद होणारे दरवाजे दिले आहेत. एसटी प्रशासनाने पहिल्यांदाच हिरकणीचे रूप बदलले आहे. बसचा रंग पांढरा व गुलाबी केला आहे. दापोडीतील कार्यशाळेत दोनशे नव्या बसची बांधणी केली जात आहे. यापैकी २० गाड्यांचे काम पूर्ण झाले असून, काही आगारांतून वाहतूकही सुरू झाली आहे. जसजशा गाड्या तयार होतील, तसतशा राज्यातील सर्वच विभागांना देण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक दत्तात्रेय चिकुर्डे यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.