Odisha Train Accident : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशा दौऱ्यावर; जखमींची करणार चौकशी

घटनास्थळी ट्रेनचे (Odisha Train Accident) अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे.

187
Odisha Train Accident : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशा दौऱ्यावर; जखमींची करणार चौकशी

ओडिशा (Odisha Train Accident) या ठिकाणी तीन ट्रेन्सचा शुक्रवारी (२ जून) अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर कटकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

घटनास्थळी ट्रेनचे (Odisha Train Accident) अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. आतापर्यंत या मार्गावरील ९० ट्रेन रद्द करण्यात आल्या तर इतर ४६गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. आज, म्हणजेच रविवार ४ जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh L. Mandaviya) ओडिशामधील परिस्थितीचा आढावा घेऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. सध्या रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सोमवारी ५ जूनपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – Odisha Train Accident: पंतप्रधानांकडून अपघातस्थळाची पाहणी; म्हणाले, दोषींना कठोर शिक्षा होणार)

ओडिशा रेल्वे अपघातातील (Odisha Train Accident) मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाखांची मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील किरकोळ जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही पहा – 

ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोरनजीक शुक्रवार (२ जून) रोजी संध्याकाळी ७ वाजून २० मिनीटांनी तीन गाड्यांचा अपघात झाला. यात आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कोरमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर त्याच्या डब्यांची शेजारच्या रूळांवरून धावणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला धडक बसली. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा अधिक वाढला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.