Apple Stores : देशात ‘या’ ठिकाणी सुरू होणार आणखी तीन अ‍ॅपल स्टोअर्स

नवीन सुरू होणारी 3 स्टोअर्स (Apple Stores) पहिल्या २ स्टोअर्सप्रमाणेच मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू होणार आहेत.

296
Apple Stores : देशात ‘या’ ठिकाणी सुरू होणार आणखी तीन अ‍ॅपल स्टोअर्स

वीस – पंचवीस देशांच्या जीडीपीपेक्षा श्रीमंत असलेली बलाढ्य कंपनी म्हणजे अ‍ॅपल (Apple Stores). लोकांच्या आग्रहाखातर काही दिवसांपूर्वी Apple या कंपनीने भारतात रिटेल स्टोअर सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अ‍ॅपलने भारतातले पहिले रिटेल स्टोअर मुंबईत उघडले तर दुसरे स्टोअर देशाच्या राजधानीत उघडले. अशातच अ‍ॅपलच्या स्टोअरबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – गुगलमुळे नाती होणार घट्ट; मेसेज तुमचा, वाक्यरचना गुगलची; काय आहे ‘हा’ नेमका प्रकार?)

अ‍ॅपल कंपनी २०२७ पर्यंत भारतामध्ये आणखी ३ स्टोअर्स (Apple Stores) सुरू करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गचे अ‍ॅपलचे मुख्य वार्ताहर मार्क गुरमन यांनी याबाबत एक ट्विट पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले, ”Apple २०२७ पर्यंत नवीन ५३ स्टोअर्सवर काम करत आहे. ज्यामध्ये चीन, जपान आणि कोरियामधील अनेक नवीन ठिकाणांचा समावेश आहे. तसेच भारतात तीन आणि मियामी, डेट्रॉईट, लंडन आणि जर्मनीमध्ये नवीन आउटलेट या ठिकाणांचा समावेश आहे.”

हेही पहा – 

मार्क गुरमन यांच्या मते , नवीन ३ सुरू होणारी स्टोअर्स (Apple Stores) पहिल्या २ स्टोअर्सप्रमाणेच मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू होणार आहेत. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील बोरिवलीमध्ये देशातील तिसरे अ‍ॅपल स्टोअर सुरू होऊ शकते. तसेच २०२७ मध्ये पाचवे स्टोअर हे वरळी येथे सुरू केले जाणार आहे. अ‍ॅपल टेक जायंटचे चौथे स्टोअर हे २०२६ मध्ये सुरू होणार आहे. जे राजधानी दिल्लीमधील DLF Promenade मॉलमध्ये आहे. हे भारतातील कंपनीचे सर्वात मोठे दुसरे रिटेल स्टोअर असू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.