Dhule Rain :धुळे शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे (Dhule Rain) शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या व काढणीस आलेल्या बाजरीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

232
Dhule Rain :धुळे शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

गेल्या काही दिवसांपासून धुळ्यातील (Dhule Rain) तापमानाचे प्रमाण अधिक वाढले होते. अशातच हवामान खात्याकडून पुढील काही दिवस पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र असं असतांना आज म्हणजेच रविवार ४ जून रोजी धुळ्यातील अनेक भागांत वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी (Dhule Rain) लावली. काही भागांत गारा देखील पडल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे तिथल्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – Drugs banned : केंद्र सरकारने आरोग्यासाठी घातक असणाऱ्या ‘या’ औषधांवर घातली बंदी)

वातावरणात गारवा मात्र पिकांचे नुकसान

शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Dhule Rain) हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावताच भले मोठे झाड उन्‍मळून पडले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागांत गारांसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे टोमॅटो आणि अन्य पिकांनाही फटका बसणार आहे. अनेक जणांच्या शेतात कांदा काढून ठेवला असून, तो देखील सडण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे (Dhule Rain) शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या व काढणीस आलेल्या बाजरीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. या पावसामुळे तरकारी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसह कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हा पाऊस (Dhule Rain) नुकसानकारक असला, तरी खरिपासाठी योग्य असल्याची चर्चा शेतकरी वर्गामध्ये सुरू झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.