Anti-Love Jihad Law : लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू समाजाने काढला विराट मोर्चा

या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

167
Anti-Love Jihad Law : लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू समाजाने काढला विराट मोर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून धर्मांतर, लव्ह जिहाद, (Anti-Love Jihad Law) एकतर्फी प्रेम, अत्याचार अशा घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या उपस्थितीत रविवार ४ जून रोजी पुण्यात एक मोर्चा काढण्यात आला.

पुण्यामध्ये घोरपडी येथील बी टी कवडे रस्त्यावरून हिंदू समाजाने विराट मोर्चा काढत लव्ह जिहाद विरोधी कायदा (Anti-Love Jihad Law) झालाच पाहिजे अशी एकमुखी जोरदार मागणी केली. या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

(हेही वाचा – Forced conversion : “मला जबरदस्तीने धर्मांतरही करायला लावलं, आणि…”; हिंदू असल्याचं भासवत मुस्लिम तरुणाने केले हिंदू मुलीवर अत्याचार)

दरम्यान या मोर्चात (Anti-Love Jihad Law) “जागो हिंदू जागो, हर नारी की यही पुकार, साक्षी के हत्यारों का करो संहार, शासन करो सक्त कडा दुबारा ना हो हत्यारा खडा” अशा प्रकारच्या घोषणा असलेल्या पाट्या हातामध्ये घेऊन हजारो नागरिक भर उन्हात रस्त्याने चालत होते. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवीत हिंदू महिला- मुली यांच्या विरोधात होत असलेल्या लैंगिक अत्याचाराचा आणि धर्मांतराच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला.

हेही पहा –

तसेच भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी उपस्थितांनी गळ्यामध्ये भगवे उपरणे धारण केले होते. तर पुरुषांनी भगव्या टोप्या धारण केल्या होत्या. हातामध्ये भगवे झेंडे घेऊन हजारो राष्ट्रप्रेमी नागरिकांचा मोर्चा लव्ह जिहाद विरोधी (Anti-Love Jihad Law) कायद्याची आवश्यकता अधोरेखित करीत होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.