Sulochana didi : ज्येष्ठ अभिनेत्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदींचे निधन

सुलोचनादीदींच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. सुलोचना यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला.

343

पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे आज निधन झाले. वयाच्या ९४व्या वर्षी दादर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गाने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर रविवारी, ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुलोचना दीदींचे उपचारांदरम्यान प्राणज्योत मालवली. सोमवार, ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सुलोचनादीदींच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. सुलोचना यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. १९४३ यावर्षी त्यांनी अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले होते. सुलोचना यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांत चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले होते. अभिनयाच्या क्षेत्रात सुलोचना यांना भालजी पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या तालमीत सुलोचनादीदी तयार झाल्या होत्या. दीदींनी आपल्या सोज्वळ दिसण्याने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

(हेही वाचा Love Jihad : धर्मांध मुसलमानाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू तरुणीवर केले अत्याचार, धर्मांतर करायला भाग पाडले )

प्रेक्षकांच्या मनात सुलोचनादीदी म्हणजे सोज्वळ, शांत आई अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली होती. सिनेमांमध्ये त्यांनी घरंदाज भूमिका साकारल्या होत्या. सुलोचनादीदींनी २५०हून अधिक मराठी तसच हिंदी सिनेमांत आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ यांसारखे त्यांचे अनेक सिनेमे गाजले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.