Bihar : नितीश कुमारांचे अपयश : बिहारमध्ये निर्माणाधीन असलेला पूल दुसऱ्यांदा कोसळला 

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल गेल्या वर्षीही पडला होता. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट एसपी सिंगला कंपनीकडे देण्यात आलेले आहे.

189

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी, ४ जून रोजी कोसळला. वर्षभरापूर्वी याच पुलाचा एक एक स्लॅबही कोसळला होता. खगरियाच्या अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर हा पूल बांधला जात आहे. पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याचाच परिणाम म्हणून हा पूल गंगा नदीत पडला, असा आरोप केला जात आहे. पुलाचे तीन खांबही नदीत बुडाले. आता या घटनेची चौकशी करण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे.

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल गेल्या वर्षीही पडला होता. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट एसपी सिंगला कंपनीकडे देण्यात आलेले आहे. २०१४ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. २०१५ पासून पुलाचे बांधकाम सुरू झाले. आजच्या दुर्घटनेपूर्वी देखील हा पूल गंगा नदीत पडला आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अगुवानी-सुलतानगंज मार्गावर गंगा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला. अपघात झाला तेव्हा काम थांबले होते. त्यामुळे पुलावर मजूर नव्हते. हा पूल पत्त्याच्या बंगल्यासारखा गंगेत पडल्याने नदीच्या पाण्याच्या अनेक फूट उंच लाटा उसळल्या. रस्त्याच्या कडेला बसलेले लोक घाबरले. स्थानिक लोकांनी पूल कोसळण्याच्या घटनेचा व्हिडिओ बनवला.

(हेही वाचा Love Jihad : धर्मांध मुसलमानाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू तरुणीवर केले अत्याचार, धर्मांतर करायला भाग पाडले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.