मान्सून सोमवारी, ५ जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी मान्सूपूर्व पावसाचा राज्यात ठिकठिकाणी धुमाकूळ सुरू आहे. अमरावती, औरंगाबाद, नाशिक, बुलाढाणा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
अमरावतीच्या नांदगाव पेठ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे हजेरी लावली असून बिजी लँड कापड बाजारपेठतील दुकानांना याचा फटका बसला आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे देखील कोसळली.
(हेही वाचा – Odisha train accident: ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार – रेल्वे मंत्री)
अमरावतीप्रमाणे, औरंगाबादमध्येही मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरचे पत्र्याचे दुकान उडून गेल्याची घडना समोर येत आहेत. दरम्यान नाशिकमधल्या मालेगावातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आले. मालेगावमध्ये वीज पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच दुसऱ्याबाजूला मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलाढाणामध्येही अचानक वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे काही दिवसांपासून असलेल्या कडक्याच्या उन्हापासून नागारिकांना दिलासा मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community