३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट काढणार

306
३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट काढणार
३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट काढणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने विशेष टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवार, ६ जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये या तिकिटाचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपालांचे सचिव संतोषकुमार उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा – राहुल गांधी पुन्हा बरळले; म्हणतात, ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतून; गांधी, नेहरू, आंबेडकर, बोस NRIs होते’)

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा आमच्यासाठी चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात जना जनानांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन

  • शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार असून माँ जिजाबाई यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे.
  • महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळप्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पुढे सरसावला आहे.
  • अस्मानी पातशाह्यांना टक्कर देणारा आणि स्वतःच्या जोरावर स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हे महान राजे खरे नायक आहेत; हे भावी पिढीलासुद्धा कळावे ही यामागील भावना आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
  • दरम्यान, टपाल तिकीट अनावरणा नंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने शिववंदना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.