odisha train accident : कवच असते तर रेल्वे अपघात टाळता आला असता…

या तंत्रात कोणत्याही धोक्याचा संशय आल्यास रेल्वे आपसूकच ब्रेक लावते. ट्रेनचा वेग कितीही असला तरी कवचमुळे गाड्या एकमेकांना धडकणार नाहीत, हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे.

238
  • वंदना बर्वे

ओडिशात अचूक सिग्नल न मिळाल्यामुळे रेल्वे अपघात घडल्याचा दावा केला जात आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस व बंगळुरू-हावडा सुपरफास्ट ट्रेनच्या इंजिनांना कवच बसवले असते, तर हा अपघात काही प्रमाणात टाळता आला असता. कवच ही एक स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. त्याला ‘ट्रेन कोलिजन अव्हायडन्स सिस्टीम’ म्हणजेच TCAS म्हणतात. त्याची निर्मिती 2012 मध्ये भारतात झाली. इंजिन व ट्रॅकमध्ये बसवलेल्या या उपकरणाच्या मदतीने रेल्वेची ओव्हर स्पीडिंग नियंत्रित केली जाते.

या तंत्रात कोणत्याही धोक्याचा संशय आल्यास रेल्वे आपसूकच ब्रेक लावते. ट्रेनचा वेग कितीही असला तरी कवचमुळे गाड्या एकमेकांना धडकणार नाहीत, हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. ओडिशात सिग्नल अचूक न मिळाल्यामुळे रेल्वे अपघात घडल्याचा दावा केला जात आहे. कोरोमंडल एक्सप्रेस व बंगळुरू-हावडा सुपरफास्ट ट्रेनच्या इंजिनांना कवच बसवले असते, तर हा अपघात काही प्रमाणात टाळता आला असता.

सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल 4 प्रमाणित रेल कवच रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच RDSO ने तयार केले आहे. या तंत्रज्ञानामध्ये, इंजिन मायक्रोप्रोसेसर, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम अर्थात GPS आणि रेडिओ कम्युनिकेशनच्या माध्यमातून सिग्नल सिस्टम व कंट्रोल टॉवरला जोडले जाते. ही प्रणाली तैनात असणाऱ्या 2 रेल्वेंची धडक टाळते.

रेल्वेच्या माहितीनुसार, युरोपमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत कवच स्वदेशी असल्यामुळे फार स्वस्त आहे. ते बसवण्याचा खर्च 30 लाख रुपये प्रति किलोमीटर ते 50 लाख रुपये प्रति किलोमीटर एवढा येतो. हा आकडा इतर देशांत या तंत्रज्ञानावर खर्च होणाऱ्या पैशाच्या तुलनेत एक चतुर्थांश एवढा आहे. याचा अर्थ अमेरिका किंवा इतर युरोपीयन देशांत हे तंत्रज्ञान अंमलात आणण्यासाठी प्रति किलोमीटर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. कवचमुळे अनेक प्रकारे अपघात टाळता येऊ शकतो. जसे रेड सिग्नल असल्यास, ड्रायव्हरला 2 किलोमीटर अगोदरच इंजिनमधील डिस्प्लेवर ते पाहता येईल. असे असूनही, चालकाने लाल सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि वेग वाढवला तर कवच सक्रिय होते. कवच लगेच ड्रायव्हरला अलर्ट मेसेज पाठवतो. इंजिनची ब्रेकिंग सिस्टम देखील सक्रिय करते. चालकाने ब्रेक लावला नाही तर स्वयंचलित ब्रेक लावले जातात. यामुळे ट्रेन सुरक्षित अंतरावर थांबते. म्हणजेच दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर होत नाही. सिग्नलकडे दुर्लक्ष करून 2 गाड्या एकाच दिशेने जात असतील, तर ही यंत्रणा सुरक्षित अंतरावर स्वयंचलित ब्रेक लावून मागून येणाऱ्या ट्रेनला थांबवेल.

(हेही वाचा Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला )

हिवाळ्यात, दाट धुक्यात सिग्नल नीट दिसत नाही. या स्थितीत रेल्वे कवच स्वयंचलित ब्रेक लावून वेग नियंत्रित करते. त्यामुळे दाट धुक्यातही ट्रेन सुरक्षितपणे धावण्यास मदत होते. यामुळेही अपघात टळण्यास मदत होते. तसेच रेल्वे फाटकाजवळ पोहोचल्यानंतर आपोआप शिटी वाजते. आपत्कालीन परिस्थितीत या तंत्रज्ञानाद्वारे ट्रेनमधून एक स्वयंचलित एसओएस संदेश नियंत्रण कक्षाला पाठविला जाईल. एवढेच नाही तर रोल बॅक, फॉरवर्ड, रिव्हर्स मूव्हमेंट, साइड टक्कर यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्टर आणि लोको ड्रायव्हरला तात्काळ सतर्क करण्यासही कवच यंत्रणा सक्षम आहे. 2012 मध्ये यशस्वी चाचणी झाल्यानंतर यूपीए किंवा एनडीए सरकारने या तंत्रज्ञानावर पुढे काम केले नाही.

मात्र 10 वर्षांनंतर, मार्च 2022 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांनी पुन्हा एकदा 2 वेगवेगळ्या ट्रेनमध्ये प्रवास करून या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली. त्यात 2 गाड्यांची समोरासमोर टक्कर होते किंवा नाही हे पाहण्यात आले. चाचणीमध्ये असे दिसून आले की, कवचमुळे 2 गाड्या 380 मीटर अंतरावरच थांबल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.