संजय राऊत यांचे नाव घेण्याचीही माझी इच्छा नाही. ते वेडसर आहेत. म्हणून आम्ही किती दिवस त्यांना सहन करणार. त्यांच्यासाठी आमच्याकडे योग्य ती उपाययोजना आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे शिवसेनेच्या ठाकरे गटावर विशेषतः खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
राणे नेमके काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत या माणसाचे नाव घेण्याची देखील मला इच्छा नाही. राऊतांची मानसिकता संपलेली असून त्यांचे डोके ठिकाणावर राहिलेले नाही. राऊत यांना कुठे कधी आणि काय बोलावे हे देखील कळत नाही. अमित शहा हे मंत्री असले तरी भाजपाचे नेते आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपचे नेते आहेत, त्यामुळे आपल्या नेत्याला भेटणे म्हणजे मक्का मदीनाला जाणे असे होईल का, राऊत सध्या काहीही बोलत आहे. काही मिडीयाचे लोक राऊतांना प्रसिद्धी देतात ती देणे गरजेचे आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. नाही तर त्यामधून संजस राऊत बाजूला राहिल आणि वेगळे काहीतरी निष्पन्न होईल. नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी जो बहिष्कार टाकला होता त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, ब्रिटीशांनी बांधलेले संसद भवन त्याला 75 वर्षांहून जास्त काळ लोटला. इमारत दुरुस्त करण्याच्या लायक राहिली नव्हती, म्हणून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला, असेही राणेंनी यावेळी स्पष्ट केले.
(हेही वाचा Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला )
Join Our WhatsApp Community