Women Commission : महिला आयोगाची ‘आरोग्य वारी’ १० जूनपासून; पुणे-सातारा-सोलापूर प्रशासन सज्ज

२९ जूनला आषाढी एकादशीपर्यंत लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात दाखल होणार आहेत. यात महिलांची संख्या ही लक्षणीय असते.

160
घाटकोपर फलक दुर्घटनेप्रकरणी आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार गृह विभागाकडून चौकशी समितीची कार्यकक्षा निश्चित मुंबई प्रतिनिधी घाटकोपर येथे बेकायदा महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यानुसार या समितीवर जाहिरात फलक आणि पेट्रोल पंपासाठी जबाबदार असलेल्या कंपनीच्या सहभागाची तपासणी करणे, कंपनीचा पूर्व इतिहास, आर्थिक व्यवहाराचा माग आणि विविध कार्यालये तसेच अभिकरणातील अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा पुरावा तपासण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २४ मे २०२४ रोजी घाटकोपरच्या छेडानगर परिसरात बेकायदा महाकाय फलक कोसळून १६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर शहरातील जाहिरात फलक आणि त्यांची कायदेशीरता याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १० जून २०२४ च्या निर्णयान्वये चौकशी समिती गठीत केली होती. गृह विभागाने या चौकशी समितीची रचना आणि कार्यकक्षा निश्चित केली . या चौकशी समितीत सदस्य म्हणून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रेणीपेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी, आयआयटी मुंबईचे बाह्य संरचनेच्या सुरक्षेचे मूल्यांकन करण्याचा अनुभव असलेले स्ट्रक्चरल अभियंता, आर्थिक अनियमितता आणि कर चुकवेगिरीचा तपास करण्याचा अनुभव असलेला आयकर अधिकारी किंवा आयकर आयुक्त, आर्थिक तपास आणि लेखा परीक्षणात निपुण असलेले सनदी लेखाकार यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती घाटकोपरची दुर्घटना, तिची कारणे आणि परिणामांचा क्रम तपासेल. पोलिसांच्या कल्याणकारी हेतूसाठी रेल्वे किंवा पोलिसांच्या जागा, मालमत्तेवर जाहिरात फलक मंजूर करण्याची आवश्यकता तपासणे अन्यथा प्रक्रियेचे पुनरावलोकन करणे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाच्या, रेल्वे पोलिसांच्या जमिनीवरील जाहिरात फलक उभारण्याविषयी धोरणाबाबत शिफारस करणे आदी जबाबदारी चौकशी समितीवर सोपविण्यात आली आहे. या समितीला चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे पायी निघणा-या लाखो महिला वारक-यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून आयोजित ‘आरोग्य वारी’साठी पुणे, सातारा आणि सोलापूर प्रशासन सज्ज झाले असून तीनही जिल्ह्यात आवश्यक त्या सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वत: या यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
‘आरोग्य वारी’चा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शनिवार, १० जून रोजी निवडूंगा विठ्ठल मंदिर, भवानी पेठ, पुणे येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
१० जूनपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक संतांच्या पालख्या पंढरपुराची वाट चालू लागणार आहेत. २९ जूनला आषाढी एकादशीपर्यंत लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात दाखल होणार आहेत. यात महिलांची संख्या ही लक्षणीय असते. या महिलांच्या स्वच्छ आणि सुरक्षित वारी अनुभवासाठी राज्य महिला आयोगाकडून आरोग्य वारी उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनसोबत दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविणण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने तीन ही जिल्ह्यात व्यवस्था करण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यात महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या, सुरक्षिततेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले असून १६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ८ उपकेंद्रात हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेत पिण्याचे पाणी, शौचालय या सह तात्पुरते निवारा व्यवस्था करण्यात येत आहे. प्राथमिक उपचार सुविधा देणारे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. महिला वारक-यांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्थाही निवारा केंद्रात करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावर महिला भाविकांसाठी ४८८ आरोग्य कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ८७ अँम्ब्युलन्स पथक नेमण्यात आले असून प्रत्येक पथकात १ महिला स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आली आहे. मुक्कामी ठिकाणी २४ पथके किमान १ महिला कर्मचारीसह नियुक्त केली आहेत. पालखी मार्ग, मुक्काम, विसावा येथे कार्डिओ आणि अँम्ब्युलन्ससाठी आवश्यक औषध पुरवठा करुन ठेवण्यात आला आहे. गावातील महिला बचत गट, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत औषध उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिकांचा सहभाग, सहकार्य घेतले जाणार आहे. सँनिटरी नँपकीन, त्याचे विघटन याचेही नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा, कर्मचारी वर्ग नियुक्ती करण्यात येत आहे. संपुर्ण पालखी मार्गावर महिलांसाठी १४०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून पाणी, लाईट, महिला समन्वयक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दिशा दर्शक फलक लावण्यात आले आहेत. मार्गावारील खाजगी शौचालयही महिलांना उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत त्यावर पांढरे झेंडे लावण्यात येणार आहेत. स्नानगृहाची व्यवस्था, कपडे बदलासाठी आडोसा स्थानिर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करण्यात येत आहे. संपूर्ण  मार्गावर, राहायच्या ठिकाणी स्वच्छ प्रकाश असेल यासाठी ५ दिवस आधीपासूनच लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे.
पुणे व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यात अंगणवाड्यांमधे महिला वारकर्यांसाठी न्हाणीघर, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून दुचाकी वर तैनात आरोग्य पथकाची सोय करण्यात आली आहे. पिवळ्या रंगाच्या या दुचाकी लगेच ओळखता येतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. महिला निवारा कक्षात महिला नोडल अधिकारी, २१ ठिकाणी हिरकणी कक्ष सातारा जिल्हा प्रशासनाने तयार केले आहेत. तर सोलापुर जिल्ह्यात दर दिड किमी वरच्या निवारा कक्षात निर्भया पथक गस्त घालणार आहे, ४० ठिकाणी हिरकणी कक्ष, २५ डाँक्टर पथक अशा सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. तीन ही जिल्ह्यातील प्रशासन आणि पोलिसांनी उत्तम तयारी केली असून आवश्यक गोष्टींची अंमलबजावणी झाली आहे. पंढरीच्या ओढीने निघालेल्या लाखो महिला वारक-यांना सुरक्षित, स्वच्छ वारीचा आनंददायी अनुभव मिळावा यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.