Tobacco products : धुळ्यात गुटख्यासह तब्बल १ कोटी ३४ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या कारवाईसाठी सापळा रचण्यात आला होता.

167
Tobacco products : धुळ्यात गुटख्यासह तब्बल १ कोटी ३४ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

नगर मनमाड रस्त्यावरील येसगाव ता. कोपरगाव येथे संशयास्पद कंटेनरची (Tobacco products) तपासणी केली असता कंटेनरसह तब्बल १ कोटी ३४ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात गुटखा, पानमसाला व सुंगधी तंबाखू (Tobacco products) यांचा समावेश असून या मालाची बेकायदा वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे.

या कारवाईमुळे तंबाखूजन्य पदार्थाची (Tobacco products) बेकायदेशीर वाहतूक, विक्री व साठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात बंदी असलेल्या या तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी कंटेनर चालक अहमद (वय – ४५) रा. रनसीका (ता. हतीन, जि. पलवल, हरियाना) यांच्या विरूद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Spam Call : ‘स्पॅम कॉल’ला करा कायमचा बाय बाय; व्हॉट्सअॅप आणि ट्रु कॉलर यांचे येणार नवे फिचर)

या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या कारवाईसाठी सापळा रचण्यात आला होता. इंदौर येथून येवला मार्गे अहमद नगर जिल्ह्यात एमपी०९/जीजी- २००९ या क्रमांकाच्या कंटेनरमधून तंबाखूजन्य पदार्थाची (Tobacco products) बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याचे कळाल्यानंतर या वाहनाला अडविण्यात आले होते.

यावेळी संपूर्ण वाहनाची तपासणी केली असता विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ (Tobacco products) आणि पान मसाला असा जवळपास ५० लाखाचा माल व ५१ लाख रूपये किंमतीचा कंटेनर असा जवळपास १ कोटी ३४ लाख रूपये किंमतीचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे. पोलीसांनी विमल पान मसाल्याच्या ४५ गोण्या जप्त केल्या असून त्यांची किंमत १९,६०,२०० रूपये आहे. तर ब्लॅक लेबल टोबॅकोच्या (Tobacco products) ९ गोण्यांची किंमत २ लाख ९७ हजार आहे. राजर्षी पान मसाला गुटख्याच्या २० गोण्यांची किंमत ६ लाख ३२ हजार रूपये असून रजनीगंधा पान मसालाच्या ९ गोण्यांची किंमत ११ लाख रूपये आहे. ४ लाख ६६ हजार ५६० रूपये किंमतीचे तुलसी दर्जाच्या गोण्या कंटेनरमध्ये आढळून आल्या तर १५ हजाराची बिग तंबाखू व २ लाख ३५ हजार रूपयांची विमल पान मसाला गुटख्याच्या बिग पॅक असलेल्या ५ गोण्या आढळल्या आहेत. या शिवाय १९,१४,००० रूपये किंमतीच्या ६० बॅगा तर २८ हजार ८०० रूपये किंमतीच्या एमकेमीनीबारी असे मजकूर लिहिलेल्या ३६ गोण्या पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांकडून याचा पुढील तपास सुरु आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.