व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांसाठी सातत्याने नवनवीन फिचर्स (features) घेऊन येत असते. असेच एक भन्नाट स्क्रीन शेअरिंगचे (Screen sharing) नवीन फिचर व्हॉट्सअॅप घेऊन आले आहे. या नवीन फिचरमध्ये वापरकर्त्यांना व्हिडीओ कॉलवर (Video call) आता स्क्रीन शेअरिंगचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. या फिचरची चाचणी बीटा व्हर्जनमध्ये (Beta version) करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Apple Stores : देशात ‘या’ ठिकाणी सुरू होणार आणखी तीन अॅपल स्टोअर्स)
स्क्रीन शेअरिंगचा पर्याय वापरताना वापरकर्ते जी माहिती शेअर करतील, ती व्हॉट्सअॅपपसुद्धा अॅक्सेस करु शकेल. त्यात प्रामुख्याने पासवर्ड, पेमेंट डिटेल्स, फोटो, मेसेजेस तसेच ऑडिओचाही समावेश असणार आहे. म्हणजेच हा पर्याय वापरताना एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड (End-to-end encrypted) राहणार नाही. तसा इशारा देणारा संदेश स्क्रीन शेअरिंग सुरू करण्यापुर्वीच दिसेल.
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना व्हिडीओ कॉलदरम्यान कॅमेरा स्विच या पर्यायाच्या बाजूला हे फिचर मिळणार असून स्क्रीन शेअरिंगच्या परवानगीनंतरच हा पर्याय उपलब्ध होईल. पर्यायावर टॅप केल्यानंतर एक इशारा देणारा संदेश स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर ‘स्टार्ट नाऊ’वर टॅप केल्यानंतर स्क्रीन शेअरिंग सुरू होईल. वापरकर्ते कोणत्याही क्षणी सुरू असलेली स्क्रीन शेअरिंग थांबऊ शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community