Odisha Train Accident : रेल्वेने दिले डबल लॉकिंग प्रणालीच्या तपासणीचे आदेश

रेल्वेने देशभरातील रेल्वे स्थानकांवर सिग्नलिंग सिस्टिम आणि “डबल लॉकिंग’ प्रणालीच्या सुरक्षा तपासणीचे आदेश जारी केले आहेत.

259
Odisha Train Accident : रेल्वेने दिले डबल लॉकिंग प्रणालीच्या तपासणीचे आदेश

ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघाताच्या (Odisha Train Accident) तीन दिवसांनंतर रेल्वेने देशभरातील रेल्वे स्थानकांवर सिग्नलिंग सिस्टिम आणि “डबल लॉकिंग’ प्रणालीच्या सुरक्षा तपासणीचे आदेश जारी केले आहेत. यासाठी आठवडाभर मोहीम राबावण्यास सांगितले आहे. मोहीमेत हे निश्चित केले जाईल की, जेव्हा केव्हा स्थानकांवर सिग्नलिंग रिले रूम उघडेल आणि बंद होईल, त्या वेळी एसएमएस अलर्ट जनरेट करण्याची प्रणाली योग्यरीत्या काम करेल.

(हेही वाचा – Odisha train accident: ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार – रेल्वे मंत्री)

रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशांत स्पष्ट केले की, स्टेशन सीमेसोबत सर्व केबिन हाउसिंग सिग्नलिंग उपकरणाची तपासणी केली पाहिजे आणि डबल लॉकिंगची व्यवस्था निश्चित केली जावी. पत्रात कर्मचाऱ्यांना हेही निश्चित करण्याचे निर्देश दिले की, सिग्नलिंग उपकरणासाठी डिस्कनेक्शन आणि रिकनेक्शन निश्चिम मानक आणि प्रक्रियांनुसार केले जावे. दक्षिण पूर्व रेल्वेअंतर्गत (एसईआर) येणाऱ्या बालासोरसाठी स्वदेशी तंत्रज्ञानासाठी स्वदेशी तंत्रज्ञानासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी तीन वर्षांत एकही पैसा खर्च केला नाही. कमी घनतत्वाचे रेल्वे नेटवर्कवर (1563 आरकेएम) कवचसाठी 468.9 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, मार्च 2022 पर्यंत काहीच खर्च झाला नाही. (Odisha Train Accident)

हेही पहा – 

ओडिशा (Odisha Train Accident) सरकार भुवनेश्वर, पुरी आणि कटक रेल्वेस्थानकांहून रेल्वेची वाहतूक सुरळीत होईपर्यंत अडकलेल्या प्रवाशांना कोलकात्याला जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करत आहे. राज्याचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सोमवारी ही माहिती दिली. तीन शहरांतून 59 बसद्वारे प.बंगालचे प्रवासी कोलकातासाठी रवाना झाले आहेत. यासोबतच बालासोरमध्ये दुर्घटना प्रभावित रेल्वे रुळांची पूर्ण दुरुस्ती केली आहे. त्यावर सोमवारपासून रेल्वे धावण्यास सुरुवात झाली. हा भाग ओलांडणारी पहिली मालगाडी रविवारी रात्री रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत पाठवण्यात आली. सोमवारी रुळाच्या दोन्ही बाजूला पडलेला ढिगारा झाकण्यासाठी पडदे लावण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.