देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये (Top University) आयआयटी मद्रास लागोपाठ 5व्या वर्षी टॉपवर आणि बंगळुरूची आयआयएससी दुसऱ्या स्थानी आहे. जाहीर झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क-2023 नुसार, आयआयटी-दिल्ली गेल्या वर्षापेक्षा एक स्थानाची प्रगती करत तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर प्रथम दहा विद्यापीठामध्ये (Top University) महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नाही, ही अतिशय निराशाजनक बाब आहे.
देशभरातील टॉप-10 (Top University) उच्च शिक्षण संस्थांमध्ये 7 आयआयटी आहेत. एम्स दिल्ली 3 स्थानांची प्रगती करत नवव्यावरून सहाव्या क्रमांकावर पोहोचली. तसेच बीएचयू 2018 ते 2021 पर्यंत १०व्या स्थानी होते, पण गेल्या दोन वर्षांपासून ११व्या क्रामांकावर आहे.
(हेही वाचा – President Draupadi Murmu : राष्ट्रपती मुर्मू यांना ‘या’ देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान; ठरल्या पहिल्या भारतीय महिला)
शिक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या उच्च शिक्षण संस्थांच्या (Top University) रँकिंगमध्ये यंदा 5,543 शिक्षण संस्थांनी भाग घेतला होता. यावेळी एकूण क्रमवारीशिवाय 12 विषयांमधील क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यात इनोव्हेशन आणि कृषीशी संबंधित संस्थांची क्रमवारी प्रथमच जाहीर करण्यात आली. 2016 पासून देशातील उच्च शिक्षण संस्थांची ही क्रमवारी जाहीर केली जात आहे.
दिल्लीतील आयआयटी, (Top University) एम्स आणि जेएनयूला टॉप-10 मध्ये स्थान मिळाले आहे. जेएनयू दिल्ली आतापर्यंतच्या सर्व क्रमवारीत टॉप-10 मध्ये सहभागी होणारे एकमेव विद्यापीठ ठरले आहे. 2018 मध्ये ते विद्यापीठ सहाव्या स्थानी होते, मात्र मागील दोन वर्षांपासून 10व्या क्रमांकावर आहे. जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठाला 12वे आणि दिल्ली विद्यापीठाला (डीयू) 22वे स्थान मिळाले आहे. दिल्ली विद्यापीठ 2018 च्या क्रमवारीत 14व्या आणि 2022 च्या क्रमवारीत 23व्या स्थानी होते.
कृषिसंबंधित संस्थांच्या (Top University) क्रमवारीत दिल्लीतील इंडियन अॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर करनालची नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट व तिसऱ्या स्थानी लुधियानातील पंजाब कृषी विद्यापीठ आहे.
हेही पहा –
विधी महाविद्यालयांत (Top University) बंगळुरूतील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिव्हर्सिटी आणि दिल्लीतील नॅशनल लॉ यूनिव्हर्सिटी 2018 ते आतापर्यंत सर्व क्रमवारीत पहिल्या व दुसऱ्या स्थानी लागोपाठ कायम आहेत.
मॅनेजमेंट संस्थांमध्ये आयआयएम-अहमदाबाद लागोपाठ चौथ्या वर्षी अव्वल स्थानी कायम राहिले आहे. टॉप-10 मध्ये (Top University) आयआयटी-दिल्ली व आयआयटी-बॉम्बेदेखील आहेत.
सर्व राज्यांतून ज्या संस्थांना टॉप-100 मध्ये (Top University) स्थान मिळाले त्यापैकी प्रत्येक राज्यातून सर्वोच्च क्रमवारी मिळवणारी संस्था तांत्रिक शिक्षणाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ गुजरातची आयआयटी-गांधीनगर (24), राजस्थानची बीआयटी-पिलानी (25), मध्य प्रदेशची आयआयटी-इंदूर (28), झारखंडची आयआयटी आयएसएम-धनबाद (42) आणि बिहारची आयआयटी-पाटणा (66) या संस्थांचा यात समावेश आहे. मेडिकल कॉलेजांच्या क्रमवारीत 5 वर्षांपासून दिल्ली एम्स प्रथम स्थानी आहे. चंदीगड पीजीआय दुसऱ्या व वेल्लोरची सीएमसी तिसऱ्या स्थानी.
डेंटल कॉलेजांत चेन्नईचे सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्स (Top University) मागील दोन वर्षांपासून पहिल्या स्थानी आहे. यापूर्वी 2021 मध्ये तिसऱ्या व 2020 मध्ये चौथ्या स्थानी होते.
इनोव्हेशनमध्ये प्रथमच स्वतंत्र क्रमवारी जाहीर झाली. आयआयटी-कानपूर (Top University) प्रथम स्थानी. पहिल्या 7 स्थानी आयआयटी आहेत. दुसऱ्या ते सातव्या स्थानी अनुक्रमे मद्रास, हैदराबाद, दिल्ली, रुरकी, बंगळुरू आणि बॉम्बे आयआयटी आहेत.
Join Our WhatsApp Community