राज्याचे पर्यटनमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गोराई परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले असून, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वॉर म्युझियम साकारले जाणार आहे
लोढा यांनी मुंबई उपनगर परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नुकतेच मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर शासकीय कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा देशभर उत्साहात साजरा केला जात असताना, मंत्री लोढा यांनी याठिकाणी एक नवी घोषणा देखील केली आहे.
(हेही वाचा Game Jihad : मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू मुलांचे होतेय धर्मांतर; आरोपी शाहनवाज कुटुंबासह फरार)
गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार या संदर्भात प्रेरणा देणारे व माहिती देणारे एक भव्य संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार असल्याची माहिती यावेळी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या संग्रहालायामुळे पुढील पिढ्यांना छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community